Kolhapur Politics: मुश्रीफांकडून मला त्रास होतोय; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

Kolhapur Lok Sabha Constituency 2024:लोकसभा असू दे किंवा विधानसभा निवडणूक, आमचे उमेदवार समरजित घाटगेच असतील. सद्यःस्थितीत पालकमंत्र्यांकडून मला त्रास होत आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. रोज या ना त्या कारणावरून महायुतीतील पक्षांतर्गत नाराजी धुमसत आहे. तिकडे महायुतीतील राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस वाढली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी तोफ डागली आहे. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष यांनीदेखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडून आपल्याला त्रास होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा असू दे किंवा विधानसभा निवडणूक, आमचे उमेदवार समरजित घाटगेच असतील. सद्यःस्थितीत पालकमंत्र्यांकडून मला त्रास होत आहे. आजरा साखर कारखाना निवडणुकीत आम्ही विजयी झालो असतो, परंतु आमच्या पॅनेलचा पराभव झाला. कारखाना निवडणुकीत दीड हजार मतदान बनावट झाले. यापाठीमागे कोणाचा आशीर्वाद होता हे सांगायला नको. हे घडले नसते तर कोणाचीही आमच्याशी लढण्याची बिशाद नव्हती,’ असा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी केला.आजरा येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या वेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री भरमू पाटील अध्यक्षस्थानी होते, तर खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते.

Kolhapur Politics
Manoj Jarange: फडणवीस, तुमची ही सर्वात मोठी चूक; तुम्हाला आता जड जाणार, जरांगेंचा पुन्हा इशारा

खासदार महाडिक म्हणाले, "रस्ता, वीज, पाणी देणार अशी साठ वर्षे वल्गना करून काँग्रेसने देशाची सत्ता मिळविली, पण मागील दहा वर्षांत विविध विकासकामे व सर्वसामान्यांसाठी योजना राबवून देशातील २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते भारताला विश्वगुरू करू पाहात आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहावे,"

"देशाच्या हितासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करूया," असे समरजित घाटगे म्हणाले. या प्रसंगी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचे भाषण झाले. या वेळी संग्रामसिंह कुपेकर, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, रमेश कुरुणकर, सुरेश डांग, जनार्दन निऊंगरे, कृष्णा येसणे, अनिता चौगुले, सुनीता रेडेकर, ज्योत्स्ना चराटी, वर्षा बागडी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग लोंढे यांनी आभार मानले.

भाजपकडून जनतेच्या हिताचे राजकारण

खासदार महाडिक म्हणाले, ‘राममंदिरासाठी उद्घाटनाचे निमंत्रण असतानाही कॉंग्रेसचा नेता उपस्थित राहिला नाही. काँग्रेस हिंदूद्वेषाचे राजकारण करीत आहे. साठ वर्षे सत्ता हातात असलेल्यांना गरिबी दूर करता आली नाही. भाजपने दहा वर्षांच्या काळात जनतेच्या हिताचे राजकारण केले.’

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com