CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election: कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने..., श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसची बोचरी टीका

Kalyan Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी शिवसेना पक्षनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करणे अपेक्षित असताना ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kalyan Lok Sabha Election 2024: अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा Kalyan Lok Sabha Constituency उमेदवार अखेर महायुतीने जाहीर केला आहे. या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही उमेदवारी शिवसेना पक्षनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी जाहीर करणे अपेक्षित असताना ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

शिंदेंच्या मतदारसंघातील जागा फडणवीसांनी जाहीर केल्यामुळे विरोधकांनी शिंदे सेनेवर टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत Sachin Sawant यांनी शिवसेना शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. सावंत यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?

"महायुतीची महाशक्ती भाजप BJP आहे यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजप घेताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणाऱ्या कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने आता एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची शिवसेना चालते आहे हे स्पष्ट आहे."

या ट्विटच्या माध्यमातून सावंत यांनी शिंदे गटावर भाजपचा किती दबाव आहे आणि भाजपच्या म्हणण्यांनुसारच शिंदे गटाला आपले उमेदवार द्यावे लागत असल्याचे सूचित करत शिंदे गटाला टोला लगावला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्यानेच या मतदारसंघातील उमेदवारी घोषित केली नव्हती. अशातच आज शिंदे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. परंतु ती भाजप नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी घोषित केल्यामुळे विरोधकांना शिंदे गटावर टीका करण्यासाठी आयतं कोलित मिळालं आहे.

तर भाजपच्या दबावामुळे काही विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे शिंदे गटात सध्या कमालीची अस्वस्थता आहे. नाशिकमध्ये शिंदेंचे खासदार असलेल्या जागांवरूनही भाजपने खूपच ताणून धरले आहे. शिवाय मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघासाठीही भाजप अडून बसल्यामुळे शिंदेंची मोठी कोंडी झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT