Neelam Gorhe News : आमच्याकडे कुणीच पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलेला नाही; डॉ. नीलम गोऱ्हेंचा टोला

Political News : सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर करण्यात येत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराला सुरुवात केली आहे.
Neelam Gorhe
Neelam GorheSarkaranam
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 20 दिवस झाले आहेत. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर करण्यात येत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराला सुरुवात केली आहे.

महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या जागावाटपात अपेक्षा पूर्ण होतीलच, असे नाही. स्थानिक राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन तिकीट देण्याबाबत पक्षप्रमुखांकडून निर्णय घेतला जातो. पक्षांतर्गत निर्णयावर मी भाष्य करणे योग्य नाही. आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत. महायुती ही एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरूप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आमच्यात मनभेद झाले आहेत असे नाही, असे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सांगितले. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलेला नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. (Nilam Gorhe News )

Neelam Gorhe
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी डाव टाकला; अकलूज की फलटण निर्णय स्थानिक पातळीवर घ्या...

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना डावलण्यात आले. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास भाग पाडले, अशी प्रतिमा तयार केली जात आहे. परंतु अशा प्रकारे गैरसमज पसरवून टोकाचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महायुतीतील घटक पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

भाजपने उदयनराजे यांना दिल्लीत ताटकळत ठेवल्याच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना समान अधिकार दिले आहेत. छत्रपती उदयनराजे यांचा सन्मान कमी होईल, असे समजण्याचे कारण नाही. कारण ते जनतेच्या प्रश्नांसाठीच निवडणुकीत उतरत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'पुण्यातील लढत दुरंगीच'

पुणे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे उतरल्याने लढत तिरंगी होईल, असे बोलले जात असले तरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भरपूर मेहनत घेतात. परंतु काही निवडणुकीतील अनुभव पाहता पहिल्यांदा त्यांचा जो उत्साह असतो, तो काही कारणामुळे मतदानापर्यंत राहत नाही, असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे पुण्याची निवडणूक मोहोळ आणि धंगेकर अशी दुहेरीच होईल, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

'गरज असेल तरच प्रचाराला जाईन'

अजित पवार यांचे जिल्ह्यातील काम चांगले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा विजय होईल, अशी खात्री आहे. सामाजिक संस्था आणि बचत गटांच्या माध्यमातून यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात मेळावे घेतल्याने आमचा चांगला जनसंपर्क आहे. ज्या ठिकाणी माझी गरज असेल, तिथे मी प्रचाराला जाईन, असे त्यांनी सांगितले.

'आढळराव महायुतीसोबतच आहेत'

एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाची हानी होतच असते. शिवाजीराव आढळराव हे शिवसेना सोडून गेल्याने पक्षाची हानी होईल. परंतु ते महायुतीतील दुसऱ्या घटक पक्षातच गेले आहेत. त्यामुळे आढळराव ताटातून वाटीत गेले असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

R

Neelam Gorhe
Udhhav Thackeray यांचा Neelam Gorhe' ना खोचक टोला | Eknath Shinde | Vidhan Parishad | Sarkarnama

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com