Lok Sabha Election  Sarkarnama
मुंबई

Kalyan Lok Sabha Election : मोदी, ठाकरे, पवार गाजवणार कल्याण डोंबिवलीचे मैदान

Rashmi Mane

Lok Sabha Election : कालच लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. आता चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी नेते मंडळींनी आपला मोर्चा वळवला आहे. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तसतसे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.

ठाणे जिल्हातील कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे उमेदवार आहेत तर वैशाली दरेकर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदे विरूद्ध ठाकरे असी चुरशीची लढत होईल यात शंका नाही. भिवंडी मतदारसंघात भाजपाचे उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवारचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे हे उभे आहेत.

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील हे दोघेही झटत आहेत. त्यामुळे या मतदारसंघांना चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेते या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढच्या आठवड्यात कल्याण डोबिंवलीत असून प्रचार सभांचा धडाका लावणार आहेत.

या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) , शरद पवार, राज ठाकरे (Raj Thackeray ) आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) अशा बड्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) अतिशय चुरशीची होणार आहे. त्यासाठी महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील बडे नेते येत्या 12 मे , 13 मे आणि 15 मे रोजी सभा घेणार आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांचा समावेश आहे.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे ते महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. श्रीकांत शिंदेंचे मागणीवरून राज ठाकरे येत्या 12 मे रोजी डोंबिवलीत सभा घेणार आहे. मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

तर '13 मे'ला डोंबिवलीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. दुसरीकडे 12 मे रोजी भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र (बाळ्या मामा) म्हात्रे प्रचारार्थ शरद पवार हे स्वतः शहापूर आणि कल्याणमध्ये सभा घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT