Loksabha Election : पंतप्रधान मोदी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, सभेची तारीख ठरली

Raj Thackeray Rally : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत सभा घेण्याची विनंती केली. त्यानुसार येत्या 12 मे रोजी राज ठाकरे हे ठाण्यात प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
Amit Shah| Raj Thackeray | Narendra Modi
Amit Shah| Raj Thackeray | Narendra Modi Sarkarnama

Loksabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देऊनही राज ठाकरे लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यात महायुतीच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते. तिसऱ्या टप्प्यातही राज ठाकरेंनी कोकणात नारायण राणेंसाठी आयोजित सभेत भाषण केले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आणि पाचव्या टप्प्यात राज ठाकरेंच्या सभेचा धडका असणार आहे. राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील 17 एप्रिलच्या सभेत भाषण करतील. राज प्रथमच प्रचाराच्या निमित्ताने मोदींसोबत व्यासपीठावर असणार आहेत.

Amit Shah| Raj Thackeray | Narendra Modi
Eknath Shinde News : मराठा आरक्षण टिकेल, मोदींच्या समोरच एकनाथ शिंदे काय म्हणाले?

येत्या शुक्रवारी (ता.10) पुण्यात सारसबाग येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कल्याण, ठाणे, डोंबिवली (ता.12) येथे सभा होणार आहेत. तर महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची 17 मे रोजी शिवाजी पार्क येथे सभा होणार असून या सभेत ठाकरे यांचेही भाषण होणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांची भेट घेत सभा घेण्याची विनंती केली. त्यानुसार येत्या 12 मे रोजी राज ठाकरे हे ठाण्यात प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. मात्र अद्यापही सभेचे ठिकाण निश्चित झाले नाही. लवकरच सभेचे ठिकाण निश्चित होईल असे सांगण्यात येत आहे.

पहिली सभा कोकणात

राज ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा दिल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात पहिली सभा नारायण राणे यांच्यासाठी कोकणात घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंनी निशाण साधला होता. मागील दहा वर्षात उद्धव ठाकरे हे साडेसात वर्ष सत्तेत होते. तरी उद्योग राज्याच्या बाहेर कसे गेले, असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com