<div class="paragraphs"><p>murder case in kalyan&nbsp;</p></div>

murder case in kalyan 

 

Sarkarnama 

मुंबई

आईच्या मदतीने मुलीनेच कॉन्स्टेबल पित्याला ठेचलं

सरकारनामा ब्युरो

कल्याण  : मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात (Kurla Police Station) कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश बोरसे (Prakash Borse) असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. घरगुती वादातून पत्नी आणि मुलीनेच घरातील खलबत्त्याने ठेचून बापाची हत्या केल्याने कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी (Kolsewar) पावशेनगर खळबळ माजली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी आणि मुलीला बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणाचे तपास अधिकारी सुनील गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश बोरसे हे कुर्ला पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशेनगर परिसरात आपल्या कुटूंबासोबत राहत होते. तीन वर्षापूर्वी त्यांची मुलगी भाग्यश्री हिचे लग्नही झाले, मात्र मुलगी आपल्या पती सोबत राहत नसल्याने प्रकाश आणि त्यांच्या पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांच्यामध्ये सतत वाद होत होते. काल रात्री देखील त्यांच्यात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वादात पत्नी आणि मुलीने बोरसे यांची खलबत्त्याने मारून डोके ठेचून त्यांची हत्या केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी प्रकाश यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री बोरसे या दोघींना अटक केली आहे.

कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे गुरुवारी (६ जानेवारी) संध्याकाळी सात वाजता कामावरून घरी आले. घरी आल्यानंतर त्यांचे मुलगी भाग्यश्री आणि पत्नी ज्योती यांच्याशी भांडण सुरु झाले. या भांडणात राग अनावर झाल्याने भाग्यश्रीने वडीलांच्या डोक्यात खलबत्त्याने वार केला. यात तिची आईही सोबत होती. या हल्ल्यात प्रकाश बोरसे यांचा जागीच मृत्यू झाला.वडीलांची हत्त्या केल्यानंतर दोघीही घराचा दरवाजा बंद करून एका बाजूला तब्बल चार तास घरातच बसून होत्या.

कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बशीर शेख यांनी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पाठवलं. पोलीस घराचा दरवाजा तोडून घरात शिरले. घरात प्रकाश बोरसे यांचा मृतदह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. तर दोघीही मृतदेहाशेजारी बसून होत्या. पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT