उस्मानाबाद : परिवहनमंत्री अनिल परब यांनी फसवणुकीने रत्नागिरीमधील दापोली येथील समुद्र तटावर 17800 स्क्वेअर फूटाचे पंच तारांकित रिसॉर्ट बांधलं आहे. या आरोपानंतर अनिल परबांवर (Anil Parab) फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. याबाबत अनिल परब यांनी स्पष्टीकरण केले आहे. ''सोमय्यांना माफी मागावीच लागेल,'' असे परब म्हणाले. उस्मानाबाद येथे ते माध्यमांशी बोलत होते.
''लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अॅफिडेवीट सुपूर्द केलं आहे. त्यामध्ये अनिल परब यांच्या रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्यात आल्याचा उल्लेख आहे. दोन चौकशींमध्ये सुद्धा आढळून आलंय की, नगर रचना विभागानं सदर जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही.
याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं गेलं होतं. ते पत्र अनिल परब यांचे सहकारी मित्र अधिकाऱ्यांनी महसूल कार्यालयाच्या फाईलमधून गायब केलं होतं" असा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे. अनिल परब मंत्रिपदावर असताना या प्रकरणाबाबत निर्दोष आणि निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळे अनिल परबांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
याबाबत अनिल परब म्हणाले, ''कोकणातील रिसॉर्ट शी माझा काहीच संबंध नसताना देखील माझी वारंवार बदनामी करणाऱ्या किरीट सोमय्या यांना माझी माफी मागावीच लागेल. राज्याच्या यंत्रणा असतील किंवा केंद्रीय खात्याने तपास केला त्यात ईडी सारख्या सुद्धा संस्थानी देखील तपास केला त्यात माझा कसला ही संबंध नाही हे सिद्ध झाले असताना किरीट सोमय्या हे वारंवार या प्रकरणाशी माझे नाव जोडून माझी बदनामी करत आहेत. त्यांच्या विरोधात मी कोर्टात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांना 100 कोटी रुपये तर द्यावे लागतील किंवा माझी माफी तरी मागावी लागेल," परब आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.