Kalyan Rural Assembly election 2024  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena News: उद्धव ठाकरेंसमोर पेच; भोईर की मुंडे; कुणाला उमेदवारी मिळणार?

Kalyan Rural Assembly election 2024 Subhash Bhoir Vs Rohidas Munde: मी भोईर यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. वर्षभरापूर्वी मुंडे यांनी भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे काम चोख पार पाडले आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli News: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून जागा निश्चिती होऊन उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत.

राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुभाष भोईर व शिवसेना शिंदे गटातून रमाकांत मढवी, राजेश मोरे हे प्रमुख उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात पक्षाकडून उतरविले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांच्याच नावाची ग्रामीण भागात आतापर्यंत चर्चा सुरु असताना आता ठाकरे गटातून दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.त्यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मी भोईर यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. वर्षभरापूर्वी मुंडे यांनी भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात आवाज उठवीत त्यांनी पक्षाचे काम चोख पार पाडले आहे.

कल्याण ग्रामीणसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांचे नाव आघाडीवर असतानाच आता रोहिदास मुंडे यांनी देखील कल्याण ग्रामीणमधून भोईरांसोबत आपण ही उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. 'मातोश्री'कडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण ग्रामीणमधून कोणाला उमेदवारी देतात हे पाहावे लागणार आहे.

"कल्याण ग्रामीण भागात माझे काम आहे. मी यापूर्वी देखील विधानसभेची निवडणूक लढवली आहे. मला निवडणूकीचा अनुभव असून प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते की त्याने निवडणूक लढवावी. माझी देखील तशी इच्छा असून वरिष्ठांना ती मी कळवली आहे. सुभाष भोईर हे माजी आमदार आहेत, त्यांचे काम आहे. पण मी देखील तेवढाच तगडा दावेदार असून जबाबदारी दिल्यास मी तेवढ्याच ताकदीने निवडणूक लढवेल," असे मुंडे यांनी ठाकरे यांना सांगितले आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT