Kangana Ranaut On Uddhav Thackeray : अभिनेत्री कंगना राणावत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने कंगनाचे मुंबईतील तिचे कार्यालय तोडले होते. या कार्यालयाच्या काही भागाचे अनाधिकृत बांधकाम असल्याचे सांगत महापालिकेने प्रशासनाने त्यावर हातोडा चालवला होता. त्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती.
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर मूळ शिवसेनेवर हक्क सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिक्कामोर्तब केले. शिवसेना या पक्षनावासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केले. ७८ पानी निकालपत्रात आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष सुरु असताना अभिनेत्री कंगना राणावत हीने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. कंगनाने टि्वट करीत निवडणूक आयोगाचे निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
"वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही," असे टि्वट कंगनाने केले आहे. यामुळे आता ठाकरे गट आणि कंगना वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आघाडी सरकारच्या काळात कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यावर कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, "आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते...लक्षात असूद्या".
कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद तेव्हा पेटला होता.याची सुरुवात कंगनानं मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी केलेल्या तुलनेपासून झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेला तालिबान आणि बाबराची सेना असे म्हटलं होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.