Praveen Nettaru
Praveen Nettaru sarkarnama
मुंबई

Karnataka : युवा नेत्याच्या हत्येनं राजकारण तापलं ; भाजप खासदाराची कार फोडली

सरकारनामा ब्युरो

बंगळुरू (कर्नाटक) : भाजपच्या (bjp) युवा नेत्याच्या कर्नाटकात karnataka) दोन दिवसापूर्वी हत्या झाली. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने सुरू केली आहेत. हत्येच्या प्रकरणात 10 अटक केली आहे.

भाजपचे तरूण कार्यकर्ते प्रवीण नेत्तरू (३२) यांची मंगळवारी तीन जणांनी हत्या केली. प्रवीण आपले दुकान बंद करून घरी जात होते. तेव्हा त्यांची हत्या झाली. त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत हल्ला केला.

अंत्यसंस्कारासाठी प्रवीण यांचा मृतदेह नेत्तरू गावी नेण्यात आला. त्यावेळी हजारो भाजप कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी राज्य भाजप अध्यक्ष नलिन कुमार खटील यांना घेराव घातला. त्याचवेळी स्थानिक आमदार, मंत्री एस.एस. अंगारा व शेजारी उडिपी जिल्ह्यातील अन्य मंत्री व्ही. सुनील कुमार यांनाही घेराव घालण्यात आला. भाजप आंदोलक कार्यकर्त्यांच्या जमावाने कार फोडली.

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री भाजपचे युवा नेते प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. नेट्टारू हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकात हिंदू संघटनांनी बंद पुकारला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे पाच पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.

कर्नाटकात बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन एक वर्षे झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राजकीय वातावरण तापणारी घटना घडली आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते. कारण निवडणुकीच्या काळात पक्षाने ३२ तरूण कार्यकर्त्यांची यादी तयार केली होती. त्यांची हत्या झाली होती. ही यादी निवडणुकीच्या काळात भाजपच्या मुख्य विषयपत्रिकेवर होती. आता तरूण कार्यकर्त्यांच्या हत्या थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे.सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT