Karuna Sharma - Munde Sarkarnama
मुंबई

Karuna Sharma : मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी देणार होते, करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

Dhananjay Munde News : मला हिरोईनची ऑफर होती. पण मी नवऱ्यासोबतच राहिले. माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते असा खळबळजनक दावा करुणा शर्मांनी केला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Political News : मला हिरोईनची ऑफर होती. पण मी नवऱ्यासोबतच राहिले. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते असा खळबळजनक दावा करुणा शर्मांनी केला आहे. करुणा शर्मा यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले होते.

मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केला. मोठमोठ्या दिग्दर्शकांनी मला हिरोईनचा रोल ऑफर केला होता. पण त्या सगळ्या ऑफर फेटाळून लावत मी संपूर्ण जीवन माझ्या पतीसोबत घालवले. पण, माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे. मला विविध मार्गांनी त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करुणा शर्मांनी यावेळी केला.

न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर करुणा शर्मा माध्यमांसमोर आल्या. त्यांनी आपणच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला. या संदर्भातील सर्व पुरावे कोर्टात सादर केले आहेत. सादर केलेले सर्व पुरावे खरे असून, त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या सही आणि अंगठ्याचा ठसा असलेला मृत्युपत्र आणि स्वीकृतीनामा यांचा समावेश आहे. राज घनवट यांची सही देखील या कागदपत्रांवर आहे. यासोबतच धनंजय मुंडे एका गृहकर्जात जामीनदार असल्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. हे सर्व पुरावे आणि सह्या खऱ्या असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले.

करुणा शर्मा पुढे म्हणाल्या, मला रस्त्यावर आणि मीडियासमोर आणणारा धनंजय मुंडेच आहे. त्याने दलाल लोक बाजूला सांभाळले आहे. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर हे सगळे त्याचे दलाल लोक आहेत. जो मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटी रुपये ते देणार आहेत असा गंभीर आरोप यावेळी करुणा मुंडे यांनी केला.

मी त्याची पहिली पत्नी हे सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी मला रस्त्यावर आणलं आहे. ते घरात आरामात बसले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे जॉईंट अकाऊंट आहे. त्यासोबतच काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. मी त्या लवकरच माध्यमांना देणार आहे असेही करुणा शर्मांनी सांगितलं.

SCROLL FOR NEXT