Congress Politics : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचे नाशिकमध्ये 'जय श्री राम', रामनवमीच्या मुहूर्तावर जाणार काळाराम मंदिरात

Harshwardhan Sapkal Nashik Kalaram Temple Daura : प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. रविवारी रामनवमी असल्याने नाशिकच्या प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात भेट देऊन ते जय श्री राम चा नारा देणार आहेत.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. रविवारी ता. (६) रामनवमी असल्याने नाशिकच्या प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात भेट देऊन ते 'जय श्री राम' चा नारा देणार आहेत.

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात काळाराम मंदिर आहे. अयोध्येतील श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी स्वत : पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील काळाराम मंदिरात आले होते. त्यांनी काळाराम मंदिरात आरती करुन स्वच्छता केली होती. त्यानंतर देशभरात हे मंदिर चर्चेत आलं होतं.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणाची धूम असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र अयोद्धेत न जाता काळाराम मंदिरात आले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.

Harshwardhan Sapkal
Vijay Wadettiwar On Manikrao Kokate : माणिकरावांचा शेतकऱ्यांना उलट सवाल, वडेट्टीवार म्हणाले त्यांना मस्ती आली आहे...

नाशिक दौऱ्यावर आलेले महायुतीचे असोत की महाविकास आघाडीचे नेते ते श्री काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्याशिवाय राहत नाहीत. आता कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील राम नवमीचा मुहूर्त साधत काळारामाचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव होणार असून सपकाळ यावेळी उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांची पत्रकारपरिषद देखील होणार आहे.

काळाराम मंदिर कायमच राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे चर्चेत राहत असते. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील नेतेही या मंदिरात येत असतात. वनवासात असताना श्री प्रभुरामचंद्रांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या जागेवरच हे मंदिर उभारलेले असल्यामुळे त्यास विशेष महत्व व माहात्म प्राप्त झाले आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सपकाळ हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील याकडे लक्ष लागून आहे.

Harshwardhan Sapkal
Manikrao Kokate : कर्जमाफी मिळणार का? शेतकऱ्याच्या प्रश्नावर कृषीमंत्री संतापले, म्हणाले, "त्या पैशातून साखरपुडे, लग्न..."

असा असेल दौरा ..

सकाळी १० वाजता - डॉ. बाबासाहेब आंंबेडकर जयंती निमित्त शहर कॉंग्रेस जयंती समीतीच्या वतीने विश्वविक्रमी देखाव्याच्या मंडपाचे भूमीपूजन

सकाळी १०.३० वाजता -कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा(स्थळ कॉंग्रेस भवन नाशिक)

दुपारी १२.३० वाजता - श्री काळाराम मंदिर दर्शन व पत्रकारांशी संवाद

दुपारी १ वाजता- नामको चॅरीटेबल हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट

दुपारी १.३० वाजता -एन.एस.यु.आय च्या वतीने विद्यार्थ्यांसमवेत हितगूज व हुतात्मा येथे पुष्पगुच्छ वाहून अभिवादन.

दुपारी २ वाजता- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स्व. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com