Kedar Dighe, eknath shinde sarkarnama
मुंबई

Kedar Dighe : "शिंदे गट धनुष्यबाणाला इतका का घाबरला ? ; केदार दिघेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Kedar Dighe : केदार शिंदे यांनी टि्वट करीत एकनाथ शिंदेंना त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे गट (eknath shinde) आणि उद्धव ठाकरेंमधील न्यायालयीन संघर्षात काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे आता या संघर्षातील पुढच्या टप्प्यातील या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना कुणाची याबाबतचा निर्णय आता 27 सप्टेंबरला लागण्याची शक्यता आहे. (kedar dighe latest news)

एकनाथ शिंदे गटाने आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेण्याची अनुमती द्यावी,अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुनावणीसाठी असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांच्या अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांना पाचारण करणे व इतर काही याचिकांवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मज्जाव करावा, असा अर्ज दाखल केला.

खरी शिवसेना आमचीच, असा दावा करणारे एकनाथ शिंदे शिवसेना चिन्ह गोठवायला निघाले आहेत. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी निशाणा साधला आहे. केदार शिंदे (kedar dighe) यांनी टि्वट करीत एकनाथ शिंदेंना त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे.

"शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले ? बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणार, आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे, बाळासाहेबांचीच निशाणी गोठवायला निघाले आहेत," असे टि्वट दिघे यांनी केले आहे.

शिवसेना कुणाची या प्रश्नाचे उत्तर पुढील सुनावणीत मिळू शकते. या संघर्षात न्याायलयाच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून आहे. यात निवडणूक आयोगाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवले तर काय होऊ शकते? अशा स्थितीत कुणाला नवीन पक्षाची नोंदणी करावी लागेल? याबाबत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट (ulhas bapat) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

उल्हास बापट म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, निवडणूक आयोगाने निर्णय देऊच नये. आयोगाला त्यांची प्रक्रिया सुरूच ठेवता येईल पण निर्णय देता येणार नाही. चिन्ह गोठवताही येणार नाही. यात आणखी दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे राज्यपालांचे अधिकार काय आहेत? आणि दुसरा म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ काय आहे?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT