मुंबई : मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला (yakub memon)फासावर लटकावून त्याला आता 7 वर्षे झाली आहे. मात्र, कबरीबाबतच्या वादामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. यावरुन नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.
मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेल्या याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘दफनभूमीवर सुशोभीकरण करणं महापालिकेचं काम असतं. खासगी दफनभूमी असेल तर पालिकेची परवानगी घ्यावी लागते. मग याकूब मेमनच्या कबरेचं सुशोभीकरण सुरू होतं तेव्हा पेंग्विन सेनेची पिलावळ काय करत होती?’ असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे. "पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते," असा टोला शेलारांनी लगावला.
"महाराष्ट्र कलंकित झाला. महाराष्ट्राची प्रतिमा खाली गेली, याला जे जबाबदार आहेत, ज्यांनी समर्थन केले त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही करणार आहोत," असे शेलार म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "मेननची कबर सुशोभित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकराने मदत केली. शिवसेनेने नेहमीच कॉम्प्रमाईज केलं. महाविकास आघाडी सरकार चालवण्याकरता आणि मुख्यमंत्रीपद टीकवण्याकरता ठाकरेंनी कॉम्प्रमाईज करावं लागलं हे या घटनेने स्पष्ट होतंय. मविआने केलेल्या या कृतीचा आम्ही निषेध करतो.आम्ही हिंदुत्व बाजूला सारणार नाही असं सांगितलं. बाळासाहेबांचे विचार मातीत मिसळणार नाही. मात्र, त्यांनी कॉम्प्रोमाईज का केली, जनतेला याचं उत्तर दिलं पाहिजे,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.