Activists protest with posters during the Maharashtra Marathi Film Awards, opposing the release of Khalid Ka Shivaji over historical inaccuracies Sarkarnama
मुंबई

Khalid Ka Shivaji : 'खालीद का शिवाजी' चित्रपटावरून CM फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ, मंत्री शेलार अ‍ॅक्शन मोडवर, सेन्सॉर बोर्डाला दिले महत्वाचे आदेश

Khalid Ka Shivaji Controversy : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे. 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला होता.

Jagdish Patil

Mumbai News, 06 Aug : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे. 'खालिद का शिवाजी' या मराठी चित्रपटाच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला होता.

अनेक हिंदुत्वादी संघटनांकडून 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास दाखवला गेल्याचा दावा करण्यात येत आहे. यासाठी चित्रपटाविरोधात मोठी मोहीम देखील या संघटनांनी सुरू केली आहे.

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भात काही वादग्रस्त मांडणी केल्याचा आरोप करत हिंदू महासंघाने चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती. अशातच काल वरळी येथील मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सव कार्यक्रमात खालिद का शिवाजी या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून रोखावे, अशी मागणी करत दोन आंदोलकांनी हातात पोस्टर्सही घेत थेट मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

या घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम खराब करू नका, असं आवाहन आंदोलकांना केलं. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना आंदोलकांना ताब्यात घेतलं. तर या राड्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी थेट 'खालिद का शिवाजी'चा सेन्सॉर बोर्डाने फेरविचार करावा असे निर्देश दिलेत.

तसंच त्यांनी फिल्म फेस्टीवलच्या स्क्रीनिंगचा फेर चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. यावेळी शेलार यांनी विविध प्रश्न देखील उपस्थित केले. ते म्हणाले, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणी परवानगी दिली? हा कोणाचा खोडसाळपणा आहे?

कुणाच्या भावना दुखावणं किंवा चुकीचा इतिहास दाखवणं हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सीबीएफसीनं याबाबतचा फेरविचार करावा, असं प्रधान सचिव सांस्कृतिक कार्यमंत्रालयाला आपण निर्देश दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT