मुंबई : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' फेम अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आलं. तेव्हापासून सोशल मीडियापासून मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही याचे पडसाद उमटू लागले आहेत. मात्र या सर्व गदारोळातही किरण माने यांनी नुकतीच एक फेसबुक (Facebook Post) पोस्ट लिहीत आपण आपल्या विचारांवर ठाम असल्याचे सांगत मी बी कच्चा गुरूचा चेला नाय, असे म्हणत शड्डू ठोकले आहेत. (Kiran Mane latest news Update)
मालिकेतून अचानक काढल्यानंतर त्यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "देशाचा नागरिक म्हणून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. व्यक्त होण्याचा अधिकार मला संविधानाकडूनच मिळाला आहे, हक्कानं काम करणं हाही माझा अधिकार आहे, पण माझ्या व्यक्त होण्याबाबत माझ्या मालिकेच्या निर्मात्याकडे माझी तक्रार करण्यात आली. मालिकेच्या निर्मात्याने कोणतेही अधिकृत कारण न देता मला मालिकेतून काढण्यात आल्याची माहिती दिली. माझ्या व्यक्त होण्याचे कारण पुढे करत मला मालिकेतून वगळण्यात आल्याचं सांगितलं.
किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर निर्मात्यांनी मालिकेचं नव पोस्टर लॉन्च केलं आहे. त्यानंतर आता किरण मानेंनी मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसवर गंभीर आरोप केले आहेत. प्रोडक्शन हाऊसकडून माझ्याविरोधात मोठं कटकारस्थान रचलं जात असल्याचा किरण मानेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
- वाचा काय लिहीलं आहे किरण मानेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ...
''आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू झाला आहे. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत. अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप. जाऊ द्या झाडून. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे. चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच !
पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगण घालणारे आणि लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी !!!
- मालिकेच्या लाईन प्रोडूसर सचिन ससाने काय म्हणाले?
दरम्यान या प्रकरणात आता मुलगी झाली हो मालिकेचे लाईन प्रोड्यूसर सचिन ससाने यांनी किरण माने यांना मालिकेतून काढण्याचे कारण सांगितले आहे. अभिनेते किरण माने यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे काढण्यात आलं. परंतु ते त्याचा वापर राजकीय स्टंट म्हणून करत करत असल्याचा आरोप लाईन प्रोडूसर सचिन ससाने केला आहे.
मालिकेचे लाईन प्रोडूसर सचिन ससाने यांनी किरण माने यांचा हा राजकीय स्टंट केला असल्याचे म्हटले आहे. तसचे त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना सिरीयल मधून काढून टाकण्यात आल्याचही ससाने यांचं म्हणण आहे. किरण माने यांच्या चुकीच्या धोरणामुळे याआधी तीन वेळा त्यांना वॉर्निंग देण्यात आली होती, असही ससाने यांचं म्हणणं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.