Marathwada Teachers Constituency Election  sarkarnama
मुंबई

Marathwada Teachers Constituency Election : भाजपकडून किरण पाटील मैदानात ; बावनकुळेंची घोषणा

Marathwada Teachers Constituency Election : विक्रम काळे यांच्याशी होणार सामना

सरकारनामा ब्युरो

Marathwada Teachers Constituency Election : राज्यात नागपूर शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अकोला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

अकोला पदवीधर मतदारसंघातून भाजपने यापूर्वीच रणजित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मराठवाडा शिक्षक मतदार संघातील उमेदवाराची घोषणा केली.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक किरण पाटील हे भाजप आणि शिक्षक परिषदेचे संयुक्त उमेदवार असतील, असे बावनकुळे म्हणाले. किरण पाटील हे मुळचे बीडचे रहिवासी आहे.

काँग्रेसमधून हजारों शिक्षकासह किरण पाटील यांनी गेल्या १४ तारखेला भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणार मराठवाडा शिक्षक मतदार संघात किरण पाटलांमुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यांचा सामना मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याशी होण्याची शक्यता आहे.

"मराठवाड्यातील शिक्षक संघटनांमध्ये किरण पाटील यांच्या माध्यमातून भाजपची जोरदार एन्ट्री झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडे नसलेला या मतदारसंघात यंदा 100 टक्के भाजप विजय मिळवेल," असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.

"मराठवाडा शिक्षक मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. यंदा अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या प्राध्यापक किरण काळे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजप आणि शिक्षक परिषदेचे ते संयुक्त उमेदवार असतील. ते नक्की विजय मिळवतील," असे बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT