Dhananjay Munde 
मुंबई

मुश्रीफ यांच्या जावयाच्या प्रकरणात आता धनंजय मुंडेंची एन्ट्री!

ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्याचे कंत्राट त्यांनी जावयाच्या जयोस्तुते कंपनीला दिल्याचा दावा सोमय्यांनी केला होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्याचे कंत्राट त्यांनी जावयाच्या जयोस्तुते कंपनीला दिल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. त्यानंतर या कंपनीचे कंत्राट रद्द झाले. आता सोमय्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडेही बोट दाखवले आहे.

हसन मुश्रीफ यांनी जावयाला ग्रामविकास मंत्रालयाचे 15 हजार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. हे कंत्राट आता रद्द करण्यात आले आहे. ठाकरे सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनीही जयोस्तुते कंपनीला कंत्राट दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयानेही जयोस्तुतेला कंत्राट दिले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

मुश्रीमांच्या जावयाचे तीन घोटाळे आहेत. ही कंपनी नोव्हेंबर 2020 मध्ये स्थापन झाली आणि ठाकरे सरकारने 25 हजार कोटींचे कंत्राट देऊन टाकले. या सर्व घोटाळ्यांची चौकशी आता एसआयटीद्वारे करा, असे आव्हान सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिले. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे आहेत. एका सहकारी पतसंस्थेमध्ये 1200 हून अधिक बेनामी खाती उघडकीस आली असून त्याद्वारे 53 कोटी 72 लाख रुपयांचे मनी लाँर्डिंग झाल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. याच्याशी अशोक चव्हाण यांचा संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

मागील काही महिन्यांपासून एका सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकार घडल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. त्यामध्ये आता पर्यंत 1200 हून अधिक बेनामी खाती उघडकीस आली आहेत. आयकर विभागाने 53.72 कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे कुणाचे, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

चव्हाण यांच्याशी संबंधित व्यक्तींचा याच्याशी संबंध असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. आता ठाकरे सरकारने विशेष तपास पथकाद्वारे याची चौकशी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली. चव्हाण यांच्या कारखान्यांना पतसंस्थेने दिलेल्या कर्जांमध्ये घोटाळा झाल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. पतसंस्थेच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लाँडरींग झाले आहे, असा दावाही सोमय्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT