सोमय्यांच्या निशाण्यावर आता माजी मुख्यमंत्री! उद्या दिल्लीत अधिकाऱ्यांसोबत खलबतं

मागील काही महिन्यांपासून एका सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत.
Ashok Chavan and Kirit Somaiya
Ashok Chavan and Kirit Somaiya
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या निशाण्यावर आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (ashok Chavan) हे आहेत. एका सहकारी पतसंस्थेमध्ये 1200 हून अधिक बेनामी खाती उघडकीस आली असून त्याद्वारे 53 कोटी 72 लाख रुपयांचे मनी लाँर्डिंग झाल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. याच्याशी अशोक चव्हाण यांचा संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

मागील काही महिन्यांपासून एका सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकार घडल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. त्यामध्ये आता पर्यंत 1200 हून अधिक बेनामी खाती उघडकीस आली आहेत. आयकर विभागाने 53.72 कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे कुणाचे, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

Ashok Chavan and Kirit Somaiya
हॉटेल ललितमध्ये कबाब, शबाब, शराब अन् नवाब ही जुगलबंदी!

चव्हाण यांच्याशी संबंधित व्यक्तींचा याच्याशी संबंध असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. आता ठाकरे सरकारने विशेष तपास पथकाद्वारे याची चौकशी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली. चव्हाण यांच्या कारखान्यांना पतसंस्थेने दिलेल्या कर्जांमध्ये घोटाळा झाल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. पतसंस्थेच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लाँडरींग झाले आहे, असा दावाही सोमय्यांनी केला आहे.

Ashok Chavan and Kirit Somaiya
आर्यन खानला अडकवण्याचे भाजप नेत्याचेच षडयंत्र! मलिकांनी डाव पलटवला

याचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या सोमवारी दिल्लीला जाणार आहे. दिल्लीत सहकार मंत्रालय, ED, प्राप्तीकर विभाग आदी विभागांतील अधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. तसेच शुक्रवारी या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते बुलढाणा येथेही जाणार आहेत. त्यानंतर अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्येही त्यांचा दौरा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com