Kishori Pednekar, Ravindra Waikar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Group : मोदी-शहांना रोखण्यात अडकलेल्या ठाकरेंच्या 'या' दोघा शिलेदारांना शिंदे-फडणवीसांनी गाठले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मोदी-शहांविरोधात उभारलेल्या ‘इंडिया’ला मुंबईत बोलावून भाजपला हरविण्याची तयारी चालविलेल्या माजी मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंच्या दोन शिलेदारांवर जाळे टाकून शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरेंना दणका दिला आहे. कोविड घोटाळ्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली. (Latest Political News)

एकाच दिवशी पेडणेकर आणि वायकरांवर कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे-फडणवीसांच्या खेळ्यांकडे ठाकरे तूर्त तरी साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. परंतू, पेडणेकरविरोधातील गुन्हा आणि वायकरांच्या चौकशीने ठाकरेंच्या गोटातील नेत्यांना अस्वस्थ करण्याचा शिंदे-फडणवीसांचा प्रयत्न असल्याचे उघड आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. यासाठी ते मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. वायकरांवर जोगेश्वरी येथील गार्डनसाठी राखीव भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी दिशाभूल करून परवानगी मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वायकरांची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. ते शनिवारी सकाळपासूनच मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांचा जबाब नोंदवला जात आहे.

शिवसेना फुटल्यानंतरही ‘मातोश्री’प्रति असलेली श्रद्धा कायम ठेवणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित कोविड घोटळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एकीकडे पडणेकरांवर गुन्हा दाखल झाला तर दुसरीकडे वायकरांचीही चौकशी सुरू आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षातूनच पेडणेकर आणि वायकरांवर जाळे टाकले गेले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT