Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना पाच वर्षांची शिक्षा

Pakistan News : सर्वोच्च न्यायालयाने तोशखाना प्रकरणात दिलासा मागणारी इम्रान खान यांची याचिका फेटाळून लावली होती.
Former PM Imran khan
Former PM Imran khanSarkarnama
Published on
Updated on

Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावली असून एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या निर्णयानंतर त्यांना पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे इस्लामाबाद पोलिसांनी त्यांना अटक केल्याचेही सांगण्यात येत आहे.

याआधी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तोशखाना प्रकरणात दिलासा मागणारी इम्रान खान यांची याचिका फेटाळून लावली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलासा नाकारल्यानंतर इमरान खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधानांना तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने आणि खोट्या घोषणा केल्याबद्दल अपात्र ठरवले होते.

Former PM Imran khan
Pakistan Imran Khan News : मोदींपेक्षा इ्म्रान खान अधिक धोकादायक ; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, "त्यांना जन्मठेप.."

मे महिन्यात, सत्र न्यायालयाने या खटल्यातील कार्यवाहीला आव्हान देणारी खान यांची याचिका फेटाळून लावली आणि खान यांना दोषी ठरवले. तोषखाना प्रकरण दोन प्रकारे सुरू आहे. यामध्ये माजी पंतप्रधान इमरान यांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक एजन्सीदेखील त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना चौकशीसाठी बोलावत आहे. बुशरा यांनीदेखील तोशखाना विक्रीसाठी कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप होता.

दुसरीकडे इमरान खान यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल करत माझी पत्नी गृहिणी आहे, तिचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तिचा चौकशीतून दिलासा द्यावा. दुसरीकडे, याच अहवालात असे म्हटले होते की, इम्रान खान यांच्या विरोधात खूप सबळ पुरावे आहेत आणि त्यामुळेच तो कोणत्या ना कोणत्या कारणाने खटला लांबवत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

आतापर्यंत तपास यंत्रणेने बुशरा बीबी'ला एकूण 13 वेळा हजर राहण्याची नोटीस दिली आहे. पण त्या एकदाही हजर झाल्या नाहीत. यानंतर तपास यंत्रणेने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात काढून बुशरा बीबी हजर न झाल्यास तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा इशारा दिला होता.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com