Kishori Pedanekar ED Enquiry : Sarkarnama
मुंबई

Kishori Pednekar ED Enquiry: किशोरी पेडणेकर चौकशीसाठी 'ईडी'च्या कार्यालयात दाखल

Money Laundering: आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ECIR दाखल केला आहे.

अनुराधा धावडे

Mumbai News : शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विराेधात अंमलबजावणी संचालनालयाने ‘डेड बॉडी बॅग’ प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पेडणेकर आज 'ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. कोरोना काळात मृत रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या डेड बॉडी बॅगच्या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली पेडणेकरांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे पेडणेकरांच्या भोवतीचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारी काळात चढ्या दराने डेडबॉडी बॅग्ज करेदी करण्यात आल्या होत्या. या काळात किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या. खासगी कंपनीने मुंबई महापालिकेला चढ्या दराने या डेड बॉडी बॅग पुरविल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून ईडीने गुन्हा दाखल केला होता. यात एकूण ४९ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा दावा ईडी'ने केला आहे. तसेच, महापालिकेतील संशयित अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पेडणेकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडी' ने अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) दाखल केला आहे. मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतर जणांचीही नावे या ECIR मध्ये आहेत. या प्रकरणी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेडणेकरांवर काय आहेत आरोप ?

कोरोना काळात खासगी कंपनीतून 'डेड बॉडी किट बॅग' हे चढ्या दराने विकत घेण्यात आल्या. 1300 रुपये किंमतीची 'बॉडीबॅग' तब्बल सहा हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली. तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार खासगी कंपनीला कंत्राटे देण्यात आली. यातून किशोरी पेडणेकरांना 'किकबॅक' पैसे मिळाले. २१ जूनच्या 'ईडी'ने केलेल्या छापेमारीत ६८ लाख ६५ हजार रोख सापडले. तसेच, दीडशे कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT