Operation Lotus Eknath Shinde BJP sarkarnama
मुंबई

Operation Lotus : एकनाथ शिंदेंचे 35 आमदार भाजपमध्ये जाणार;अमित शाहांच्या भेटीचा फायदा नाहीच! ऑपरेशन 'लोटस'विषयी ठाकरेंचा मोठा दावा

Operation Lotus Eknath Shinde BJP : भाजपने शिवसेनेच्या फुटीनंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Roshan More

Eknath Shinde News : भाजपकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडत असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंनी तीन दिवसांपूर्वी अमित शाह यांच्याकडे केली होती. शिंदेंनी दिल्लीत जाऊन शाहांची भेट घेतली. मात्र, या भेटीचा फायदा झालेला नाही. भाजप हा शिंदेंशिवाय निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून शिंदेंचे 35 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

भाजपने एक पक्ष निर्माण केला आता त्याला संपवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने ऑपरेशन लोटस करून मूळ शिवसेना फोडली त्या फुटीचे सुत्रधार हेच शिंदे होते आता दुसऱ्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटावर घाला घालणे सुरू आहे, असा दावा देखील अग्रलेखातून करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी जी नीती वापरून लोकं फोडली तीच नीती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वापरत आहेत. पाच,पंचवीस लाख देऊन शिंदेंनी माणसं फोडली आणि आता चव्हाण होलसेल भावात ती माणसं विकत घेत आहेत. शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी 'लोटस' कार्यक्रम सुरू झाल्याचा दावा देखील 'सामना'तून करण्यात आला आहे.

अन् अमित शाह हसले...

अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील भेटीची खिल्ली देखील 'सामाना'तून उडवण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, शिंदे यांनी शाहांकडे आपली माणसं पैसै देऊन फोडली जात असल्याची तक्रार केली. त्यावेळी शाहा यांनी हसून म्हटले की, 'कोण कोणाचा पक्ष फोडत आहे. आम्ही तुमचा पक्ष फोडून बनवला आहे. तुम्ही फुटलात.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT