Balasaheb Thackeray: खरी मेख वेगळीच! उद्धव ठाकरेंवर मेहरबान होतानाच बाळासाहेब स्मारकाच्या सर्व चाव्या फडणवीसांकडे

Balasaheb Thackeray Memorial Trust Uddhav Thackeray reappointed: बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टवरील नव्या नियुक्त्यांमुळे हे स्मारक आता ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीचे न राहता राज्य सरकारच्या मालकीचे झाले आहे, असा एक संदेशही या नियुक्त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
Balasaheb Thackeray Memorial Trust news
Balasaheb Thackeray Memorial Trust newsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचा महापौर बसवायचाच आणि ठाकरेंची उरली सुरली सत्ताही नेस्तनाबूत करायची यासाठी भाजपने ठाकरेसेनेला जंग जंग पछाडले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती सरकार हा वाद विकोपाला गेला असतानाच आता फडणवीस सरकारने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबई येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्क, दादर येथील 'महापौर बंगला' जागेची निवड केली आहे. या स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे.या न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांनी फेरनिवड केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर मेहरबान होत असतानाच दुसरीकडे या स्मारकाच्या सर्व चाव्या आपल्याकडे कशा राहतील, याची काळजी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली असल्याचे दिसते.

बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टवरील नव्या नियुक्त्यांमुळे हे स्मारक आता ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीचे न राहता राज्य सरकारच्या मालकीचे झाले आहे, असा एक संदेशही या नियुक्त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

या सार्वजनिक न्यासावर उद्धव ठाकरे ,सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची पाच वर्षात साठी पुनर्नियुक्ती करण्यात आली असतानाच त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेचे दोन सदस्य ही तीन वर्षासाठी घेतले आहेत.

राज्य सरकारचा निर्णय पाहता हा बंगला सहजासहजी ठाकरे कुटुंबीयांना मिळणार नाही, अशी व्यवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याचे दिसते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी फडणवीस सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.

Balasaheb Thackeray Memorial Trust news
Chandrapur Politics: काँग्रेस कि भाजप? कुणालाही मत द्या, नगराध्यक्ष RSSचाच होणार

बाळासाहेब ठाकरे न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ट्रस्टवर राज्य सरकारचा कसा कंट्रोल राहील याकडेही जाणीवपूर्वक लक्ष ठेवले आहे. ट्रस्टचा कारभार मनमानीपणे ठाकरेंना करता येणार नाही अशी व्यवस्था फडणवीसांनी करुन ठेवल्याचे दिसते. ठाकरे सेनेचे तीनजण या ट्रस्टवर असले तरी महत्त्वाचे निर्णय हे राज्य सरकारच्या अर्थात फडणवीसांच्याच मर्जीने होणार असल्याचे दिसते.

शिंदे सेनेचे शिशिर शिंदे आणि भाजपचे पराग अळवणी हे सदस्य या स्मारकाच्या ट्रस्टवर राज्य सरकारच्या मर्जीनुसार काम करतील, हे सांगूनच मुख्यमंत्र्यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. फडणवीसांनी पूर्णपणे हे स्मारक उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेले नाही.

अद्याप सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत. या जागांवर महायुतीतील दोन जणांनी वर्णी लागणार असल्याचे समजते. राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे नगर विकास सचिव, राज्याचे विधी व न्याय सचिव आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त हे या न्यासाचे पदसिद्ध सदस्य असतील.

Balasaheb Thackeray Memorial Trust news
Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंचा नातू टॉप ट्रेडिंगमध्ये! काय आहे कारण

दादर येथील 'महापौर बंगला'च्या जागेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेथे बैठका होत असत, या बंगल्याचा वापर खासगी बैठकांसाठी होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. भाजप-शिवसेनेची युती असताना हा महापौर बंगला या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी घेतला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे या बंगल्याचा वापर आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखे ते वागत होते, असा आरोप विरोधकांनी केला होता. महापौर बंगला उद्धव ठाकरे यांना हडप करायचा आहे, असा आरोप राज ठाकरे यांनीही जाहीरपणे केला होता.

मुंबई महापालिकेचा बंगला आणि स्मारकासाठी राज्य सरकार सर्व पैसे खर्च करणार असल्याने हा ट्रस्टवर राज्य सरकारचे नियंत्रण असावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नियुक्त्या केल्या असल्याचे दिसते.

किशोरी पेडणेकरांकडून कौतुक

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरेंच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे."उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. तर आदित्य ठाकरे हे त्यांचे नातू आहेत. शेवटी सरकारनं घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा आहे. कारण सरकारमध्ये फडणवीस हे सुसंस्कृत विचाराचे आहेत. आमच्यात आणि त्यांच्यात कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते सुसंस्कृत असे नेते आहेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो," अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com