Abhijeet Panse, Niranjan Davkhare Sarkarnama
मुंबई

Konkan Graduate Constituency : उमेदवारी जाहीर होताच पानसेंचा डावखरेंवर पहिला वार; 'कोकण पदवीधर'वरून रान पेटणार

Sunil Balasaheb Dhumal

MLC Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा होण्यापूर्वीच राज्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरून वातावरण चांगलेच तापले आहे. येथून मनसेने सोमवारी (ता. २७) अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करीत भाजपवर डाव टाकला आहे. उमेदवारी जाहीर होताच पानसेंनी येथील भाजपच्या दोनवेळचे आमदार निरंजन डावखरेंवर निशाणा साधला आहे. Konkan Graduate Constituency

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपही आमदार निरंजन डावखरे Niranjan Davkhare यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. सध्या डावखरे हे कोकणात प्रचार करीत आहेत. तर शिवसेना शिंदे गट देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसून येते. असे असताना मनसेने पानसेंच्या नावाची घोषणा केली. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डावखरेंवर नाव न घेता जोरदार टीका करत पहिला वार केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या १२ वर्षांत गटार, पायवाटांशिवाय पदवीधरांसाठी ठोस काम झाले नसल्याची टीका पानसेंनी केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी Raj Thackeray कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पानसेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत, भाजपवर हल्लाबोल केला. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघासाठी आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नाही तर रोजगारनामा असेल, असेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आमचा पक्ष आदेशावर चालतो, मी मनसेकडून लढत आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असेही पानसेंनी स्पष्ट केले. आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही किंवा त्यांनी सुद्धा आमच्याशी चर्चा केलेली नाही, असे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT