Sunil Tingre News : 'ते' जुनं पत्र व्हायरल, विरोधकांकडून दिवसभर फायरिंगवर फायरिंग! अन् अखेर रात्री उशिरा...

Porsche Car Accident : आरोपीवर सुरुवातीस ३०४ अ कलम लावण्यात आले. तसेच ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आठ तासांनंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आली.
Sunil Tingre
Sunil TingreSarkarnama

Pune Hit And Run Case : गेल्या आठवड्यात पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघाताची चर्चा देशभर झाली,तर यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे पहिल्या दिवसांपासून मीडियाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांच्यावर अपघातातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी दबाव निर्माण केल्याचा गंभीर आरोप करत विरोधकांनी त्यांना घेरण्यासाठी पूर्णपणे फिल्डिंग लावली.

अशातच आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणाऱ्या ससूनमधील डॉक्टरसाठी दिलेलं जुनं शिफारस पत्र नव्यानं पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानं आधीच गोत्यात आलेल्या टिंगरेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली.त्यामुळे दिवसभऱ टिंगरेंवरचा दबाव वाढतच राहिला.त्यांचा फोन लागत नाहीये, तसेच ते फोन उचलत नाही अशा एक ना अनेक चर्चा त्यांच्याविषयी जोर धरु लागल्या. अखेर सोमवारी रात्री उशिरा टिंगरे यांनी प्रसिध्दीपत्रक काढत दिवसभर व्हायरल झालेल्या त्या पत्रावर खुलासा केला.

पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरणातील बिल्डरच्या अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी आमदार टिंगरेंनी पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळेच आरोपीवर सुरुवातीस ३०४ अ कलम लावण्यात आले. तसेच ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आठ तासांनंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आली. तसेच फक्त १५ तासांत जामीन मिळाल्याने हे प्रकरण चांगलेच तापले. यावरून घटनाक्रमांवरून टिंगरेंवर जोरदार टीका झाल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

Sunil Tingre
Hit And Run Case : उंदराच्या चाव्याने रुग्णाचा मृत्यू ते ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार व्हाया ड्रग्ज रॅकेट! 'ससून' रुग्णांसाठी 'वरदान'की...

या टीकेनंतर टिंगरेंनी आपला आणि आरोपीच्या कुटुंबाचा काही थेट संबंध नसल्याचे सांगितले. आता हे प्रकरण शांत होत नाही तोच अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमूनेच बदलण्यात आल्याचे पुढे आले. त्यामुळे ससूनमधील दोन डॉक्टरांसह एका शिपायाला अटक करण्यात आली. यातील डॉ. अजय तावरे याला टिंगरेंनी दिलेले शिफारस पत्र व्हायरल झाले. यामुळे पुन्हा टिंगरे टीकेचे धनी बनले. त्यानंतर दिवसभर टिंगरेंचा फोन आउट ऑफ कव्हरेज होता. त्यामुळे ते नेमके कुठे गेले, अशी चर्चा होती. मात्र या पत्राबाबत त्यांनी रात्री उशीरा खुलासा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tingre
Narendra Modi Vs Mamta Banerjee : पश्चिम बंगालमध्ये 'खेला होबो'! मतांची वाढलेली टक्केवारी कुणाची डोकेदुखी ठरणार?

ते म्हणाले, माझ्या शिफारस पत्रावरून दिवस सुरू असलेली चर्चा ही या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. लोकप्रतिनिधी या नात्याने अनेकांना विविध कामासाठी शिफारस पत्र द्यावे लागते. प्रत्येक पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असा उल्लेख असतो. त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते. त्यामुळे या विषयाला वेगळे वळण देणे योग्य ठरणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून चौकशीअंती ही बाब स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

Sunil Tingre
Vidhan Parishad Election News : कोकण पदवीधरवरून महायुतीमध्ये पेच; मनसेच्या भूमिकेने संभ्रम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com