मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज सकाळी अंमलबजावणी संचालनालय ईडी (ED)कार्यालयात दाखल झाले होते आहेत. त्यांना सात तासांच्या चैाकशीनंतर अटक करण्यात आली आहे. (Nawab Malik Latest News)
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप दिवाळीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टोक्तीही दिली होती. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत
नवाब मोलिक यांच्यावरील या कारवाईनंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करीत असल्याचा आरोप महाविकास महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
वानखेडे-मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप जगजाहीर आहेत. या वादात समीर वानखेडेच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी उडी घेतली होती. आज सकाळी मलिक यांच्या घरी ईडीने छापा मारला. त्यानंतर मलिक हे ईडीच्या कार्यालयात चैाकशीसाठी गेले आहे. त्यानंतर क्रांती रेडकर यांनी एक टि्वट केलं असून त्यांचा संबध या घटनेशी जोडला जात आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'तान्हाजी' चित्रपटातील 'माय भवानी' गाण्याचा आहे.
"राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांचे कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे. आघाडी सरकारमधील सर्व घोटोळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग जवळील १९ बंगल्याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिली,'' अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, '' नवाब मलिकांच्या ईडी (Ed)चैाकशीच्या निष्कर्षाची वाट पाहतो आहे. मलिकांसारखे व्यक्ती मंत्रीमंडळात राहू शकत नाही, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आज मलिक यांची ईडीने चैाकशी सुरु केल्यानंतर शिवसेनेतेच खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'ईडी-किरीट सोमय्या' अशी तीच ट्यून वाजवीत आहेत,''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.