मलिकांचे कारस्थान बाहेर येतयं ; 'त्या' १९ बंगल्यांची माहिती राज्यपालांना दिली..

सहा महिन्यापूर्वीच मी नवाब मलिक यांची माहिती सर्वांना दिली आहे,'' असे सोमय्या म्हणाले.
Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांचे कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे. आघाडी सरकारमधील नेत्यांचे सर्व घोटोळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग जवळील १९ बंगल्याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिली,'' अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, '' नवाब मलिकांच्या ईडी (Ed)चैाकशीच्या निष्कर्षाची वाट पाहतो आहे. मलिकांसारखे व्यक्ती मंत्रीमंडळात राहू शकत नाही, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आज मलिक यांची ईडीने चैाकशी सुरु केल्यानंतर शिवसेनेतेच खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'ईडी-किरीट सोमय्या' अशी तीच ट्यून वाजवीत आहेत,''

''१९ बंगल्याबाबतची खरी माहिती मुख्यमंत्री लपवित आहेत. मी दिलेली माहिती खरी की खोटी यांचे उत्तर मुख्यमंत्र्यांना जनतेला द्यावे लागेल, सहा महिन्यापूर्वीच मी नवाब मलिक यांची माहिती सर्वांना दिली आहे,'' असे सोमय्या म्हणाले.

दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज सकाळी अंमलबजावणी संचालनालय ईडी (ED)कार्यालयात दाखल झाले आहेत. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Kirit Somaiya
स्वार्थापोटी का होईना, पेडणेकर आमचा लढा लढताहेत ; राणेंनी डिवचलं

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप या आधीच भाजप नेत्यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टोक्तीही दिली होती. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत

नवाब मोलिक यांच्यावरील या कारवाईनंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com