Eknath Shinde, Ketaki Chitale, kunal Kamra Sarkarnama
मुंबई

Kunal Kamra Controversy : कुणाल कामरा प्रकरणावर बोलताना भाजप नेत्याने दिला केतकी चितळेच्या अटकेचा दाखला; म्हणाले, "कुणाचं नाव घेतलं नव्हतं तरीही..."

Sudhir Mungantiwar on Kunal Kamra : स्टण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या एका शो मध्ये गायलेल्या विडंबन गीतामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या गाण्यातून कामरा याने एकनाथ शिंदेंना टार्गेट केल्याचा आरोप करत शिंदेसेना कामराविरोधात आक्रमक झाली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 28 Mar : स्टण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने त्याच्या एका शो मध्ये गायलेल्या विडंबन गीतामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या गाण्यातून कामरा याने एकनाथ शिंदेंना टार्गेट केल्याचा आरोप करत शिंदेसेना कामराविरोधात आक्रमक झाली आहे.

सत्ताधाऱ्यांनी कामरा याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नको ते उद्योग सुरू केल्याचं म्हटलं आहे. शिवाय असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचंही सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात एफआयआर देखील नोंदवला आहे.

अशातच, 'कॉमेडियन कुणाल कामराच्या आयुष्याची कॉमेडी करा, असं वक्तव्य भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं आहे. माध्यांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पोलिसांनी कामराला पकडावं आणि त्याच्या आयुष्याची कॉमेडी करावी. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू शकत नाही.

प्रत्येकाला स्वाभिमानाचा अधिकार आहे, असं म्हणतच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) अटकेची आठवण करून दिली. ते म्हणाले केतकी चितळेने कुणाचंही नाव घेतलं नव्हतं तरीही तिला तीस दिवस तुरुंगात ठेवलं त्यामुळे विरोधकांना आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

टायरमध्ये घालून मारा

तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी तर कुणाल कामराला तात्काळ अटक करा आणि टायरमध्ये घालून मारा, असा सल्ला पोलिसांना दिला आहे, त्यामुळे सत्ताधारी कामरा विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT