Arvind Kejriwal: कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर दिल्ली पोलिसांची केजरीवालांच्या विरोधात तक्रार

Delhi Police vs Arvind Kejriwal:अनाधिकृत बॅनर कुणी लावले, याची चौकशी पोलिसांनी केली नाही, असे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत. 18 मार्चपर्यंत याबाबतचा अहवाल देण्याची सूचना कोर्टाने दिली होती.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू कोर्टात याबाबतचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे. याबाबतची सुनावणी १८ एप्रिलला होणार आहे.

यापूर्वीही याप्रकरणात राऊज अॅव्हेन्यू कोर्टातने अरविंद केजरीवाल आणि तत्कालीन आमदार गुलाब सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

अनाधिकृत बॅनर कुणी लावले, याची चौकशी पोलिसांनी केली नाही, असे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत. 18 मार्चपर्यंत याबाबतचा अहवाल देण्याची सूचना कोर्टाने दिली होती. यापूर्वी व्दारका सत्र न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळली होती.

Arvind Kejriwal
Gokul Milk Sangh: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोणाच्या मर्जीतला? नव्या चेहऱ्याला संधी....

पोलिसांच्या आपल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, रिपोर्ट दाखल करण्याच्या तारखेस नमूद केलेल्या ठिकाणी कोणतेही होर्डिंग किंवा बॅनर दिसले नाहीत. मात्र, तक्रारीच्या दिवशी बॅनर होर्डिंग्जच्या स्थितीबाबत पोलिसांनी मौन बाळगले आहे. अशा परिस्थितीत होर्डिंगचे बॅनर कोणी आणि का लावले याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Arvind Kejriwal
Nashik Kumbh Mela 2027: भाजपचे 'संकटमोचक' नाशिकच्या 'आखाड्यात'! कुंभात पहिलं शाहीस्नान कोण करणार?

पुरावा म्हणून दाखल करण्यात आलेल्या फोटोमध्ये होर्डिंग्ज आणि बॅनर तयार करणाऱ्या कंपनी किंवा संस्थेच्या नावाचा उल्लेख नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वकिलांनी केला होता. न्यायालयाने तो फेटाळला. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती कोण आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com