Ladli Behna Yojana Maharashtra Sarkarnama
मुंबई

Ladki Bahin Yojana Latest News : महायुती सरकारनं पुन्हा डाव टाकला, विरोधकांना 'दे धक्का'; 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठा निर्णय

Mahayuti Government News : 'लाडकी बहीण' या योजनेतून महायुती सरकार पुन्हा येईल, असा विश्वास महायुतीमधील नेते व्यक्त करत आहेत. तर, विरोधकांकडून महायुती पुन्हा सत्तेत येणार नसल्याने पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारची 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना 'गेमचेंजर' ठरण्याची शक्यता आहे. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गडबडलेल्या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून या योजनेवर गंभीर आरोप केले जात आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 5 महिन्यांचे हफ्ते सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. पण आता महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मोठा डाव टाकला असून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण'(Ladki Bahin Yojana) या योजनेसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महायुती (Mahayuti) सरकारने मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीसाठी आपला हुकमी पत्ता काढतानाच महत्वकांक्षी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण'योजना महाराष्ट्रात आणली. पण अद्यापही काही महिला या योजनेच्या लाभापासून मिळालेल्या नाहीत. त्याचमुळे या योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवी मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी सरकारकडून सुरुवातीला 31 ऑगस्ट ही मुदत दिली होती.त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.पण हे अर्ज अंगणवाडी सेविकामार्फतच दाखल करता येणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सरकारकडून दरमहिना 1500 रुपये मिळत आहेत. आत्तापर्यंत चार महिन्यांचे पैसे देण्यात आले असून दिवाळी आधीच दोन हप्त्यांचे पैसेही सरकारकडून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

पण या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असला तरी सरकारने मात्र ही योजना यापुढेही कायम राहणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला दर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागत असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने सरकार रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावत असल्याची देखील माहिती आहे.

माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुती सरकार पुन्हा येईल, असा विश्वास महायुतीमधील नेते व्यक्त करत आहेत. तर, विरोधकांडून महायुती पुन्हा सत्तेत येणार नसल्याचे पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT