Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंचा दुहेरी डाव; राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसच्याही मुलाखतींना हजेरी

Pandharpur-Mangalvedha Constituency : भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणी केलेले असतानाही काँग्रेसकडील इच्छुकांच्या मुलाखतीसाठीही त्यांनी सोलापुरात हजेरी लावली. त्यामुळे भगीरथ भालके यांनी दोन्ही पक्षाकडे आपला हातचा राखून ठेवला आहे.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 11 October : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मुलाखत देणारे भगीरथ भालके यांनी काँग्रेस पक्षाकडेही उमेदवारी मागितली आहे, त्यामुळे भगीरथ भालके यांना महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांकडे आपला हातचा राखून ठेवला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP SP) नुकतेच पुण्यात विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. त्या मुलाखतीला पंढरपूरमधून इच्छूक असलेले भगीरथ भालके, वसंतराव देशमुख, भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले आदी प्रमुख इच्छुकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. यात भालके यांनी २०२१ ची पोटनिवडणूक लढवली आहे.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केलेले असतानाही काँग्रेसकडील इच्छुकांच्या मुलाखतीसाठीही त्यांनी सोलापुरात हजेरी लावली. तत्पूर्वी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेही उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे भगीरथ भालके यांनी दोन्ही पक्षाकडे आपला हातचा राखून ठेवला आहे.

Bhagirath Bhalke
Dashrath Mane : पवारसाहेब नवी खोंडं आणा की हो...असली कशाला घेताय?; हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मानेंचा हल्लाबोल

वास्तविक, महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, यासाठी भगीरथ भालके यांनी यापूर्वीही शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे. मात्र, मागील पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भगीरथ भालके यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाकडे जाणार हे अद्याप निश्चित नाही.

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. उद्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला तरी आपल्याला संधी मिळावी आणि काँग्रेसकडेही गेला तर आपला विचार व्हावा, असा भगीरथ भालके यांचा दुहेरी विचार यातून दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे प्रबळ इच्छुकांची दावेदारी मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या कमी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक स्पर्धा करावी लागण्याची चिन्हे आहेत.

Bhagirath Bhalke
Shivsena UBT : नागपुरात ठाकरे सेनेच्या वाट्याला दोन जागा; उमेदवारही लागले कामाला

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता. तसेच, माढा मतदारसंघात जोडलेल्या पंढरपूरमधील १२ गावांतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षाकडे भगीरथ भालके यांच्या उमेदवारीचा दावा आहे. पंढरपूरमधून खासदार प्रणिती शिंदे यांना 45 हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे खासदार शिंदे यांनीही हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Pranita Bhalke
mahayuti and mva
Sunetra Pawar | Devendra Fadnavis
Solapur ZP nominated member election
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com