Kalyan Market Committee sarkarnama
मुंबई

Land scam : सत्ताधारी भाजप संचालकांचा भूखंड घोटाळा? कल्याण बाजार समिती प्रकरणी चौकशीचे आदेश

BJP Land scam KMC : कल्याण बाजार समितीचीमधील संचलकांनी भूखंड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी थेट चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Roshan More

KMC News : कल्याण बाजार समितीत भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात वृत्त 'सामना' वर्तमानपत्राने दिले आहे. भाजपची सत्ता असलेल्या कल्याण बाजार समितीमध्ये संचालक मंडळ बेकायदा ठराव करून जमीन लीजवर कवडीमोल भावाने देत असून यामध्ये मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रवी गायकवाड यांनी या संदर्भात तक्रार केली आहे. दरम्यान, या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश पणन सहसंचालक खात्याने कल्याण उपनिबंधकांना दिले आहे.

संचालक मंडळाने कोट्यवधीचा गैरव्यवहार करत सर्व्हे 290/2 हा भूखंड भाड्याने आणि लीजवर दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. बाजार समितीमध्ये असलेल्या जागेचा वापर व्यापारी, शेतकऱ्यांसाठी न करत ज्या इमारती आहेत त्यांच्या टेरेसवर लग्नाचा हाॅल,हाॅटेलला परवानगी दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

मार्केटमधील शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदेशीपणे गाळे बांधण्यात येणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. समितीच्या आवारातील शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदेशीरपणे 20 व्यापारी गाळे बांधण्यास समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी विरोध केला. तसेच प्रशासकाकडे दाद मागितली. त्यांच्या तक्रारी पश्चात कारवाई होत नसल्याने त्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.

बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात

बाजार समितीत सुविधा मिळत नाही, अशी तक्रार करण्यात येत आहे. त्यातच भूखंड घोटाळा आणि शेतकऱ्यांच्या जागेवरच गाळे उभारण्याचा निर्णय यामुळे बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शेतकरी शेडसाठी आरक्षित जागेवर २० व्यापारी गाळे बांधण्याचा घाट घातला आहे आणि त्यासाठी रोखीने व्यवहार झाला आहे, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT