
Mumbai News, 27 Sep : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरें मुख्यमंत्री असातनाचा दाखला देत, 'ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये.', असा टोला लगावला.
ते फडणवीस म्हणाले, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राने त्यांना कोरोना काळात पीएम केअर फंडासारखा एक फंड तयार करण्याची परवानगी दिली होती. त्या फंडात 600 कोटी रुपये जमा झाले. मात्र, त्यातील एक पैसाही त्यांनी खर्च केला नाही.'
फडणवीसांची हीच टीका आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कारण खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. भाजपवाल्यांचं मूर्खासारखं बोलणं असतं. एखादी गोष्ट अंगलट आली की, ते विषयांतर करतात. हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे.
कोरोनामध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारलाय का? कोविडमध्ये ठाकरे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राइतकी सुव्यवस्था कुठल्याच राज्यात नव्हती हे आत्ताच्या पोपटांना कळले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या राज्यात जिथे भाजपची सत्ता होती, तिथे कोविड काळात अनागोंदी अराजक माजलं होतं.
ज्या गंगेच्या किनाऱ्यावर कशी प्रेतं वाहत होती हे जगाने पाहिलंय. त्यामुळे मिस्टर देवेंद्र फडणवीस तेव्हाचे फोटो पाहा आणि त्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप करा, असंही राऊत म्हणाले. त्यानंतर राऊत म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री असतील. पण आम्हालाही काहीतरी माहिती आहे. पीएम केअर फंडात किती पैसे आहेत? हे फडणवीसांना माहितेय का? नसेल तर मी सांगतो.
महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली आणि मुंबईतील फार्मा कंपन्यांनी किती लाख कोटी दिले हे माहिती आहे का? माहीत नसेल तर मी आकडा देतो. तेच पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागितले तर तुम्ही मागचं उकरता. ही कुठलं धोरण आणलं? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी फडणवीसांना राज्य करायला शिका, असा सल्ला दिला.
राऊत म्हणाले, काहीही झालं की मागे झालं ते काढायचं तुम्ही तुमचं बोला ना. तुम्ही शेण खात आहात ते बोला. आता तुम्ही शेण खात आहात. आता तुमच्यावर जबाबदारी आहे. मिस्टर फडणवीस तुम्ही पंजाब सरकारकडे पाहा. त्यांनी पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना दिलेत. त्यांनी वाहून गेलेले प्रत्येक घर बांधून देण्याचे आश्वासन दिलंय. पण तुम्ही काय करताय तर चार वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे होते. त्याआधी शरद पवार असं करत 1948 सालापर्यंत जाल, असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.