Mumbai News : राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. काल रात्री पुन्हा एकदा वर्षावर उशीरा रात्रीपर्य़ंत बैठक पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. तसेच, त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. (Latest Marathi News)
काल रात्रीची बैठक ही तब्बल दोन तासांहून अधिक वेळ चालली. या रात्रीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप या संदर्भातला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. दरम्यान, काल रात्रीही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर रात्री उशीरापर्यंत बैठक पार पडली होती.
तिन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची बोलले जात आहे. यामुळे आज तरी याबाबत मुख्यमंत्री काही घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत राजभवन येथे लगबग सुरू असल्याचीही चर्चा आहे.
पहिल्यांदा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून खातेवाटपाची घोषणा करण्यात येईल असे समजते आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाकडून विशिष्ट खात्यांवर दावा केला जात आहे. अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खात्यांवर अजित पवार गटाने हट्ट धरला असल्याची माहिती आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास तीव्र विरोध आहे, अशीही चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.