Sharad Pawar v/s Bhujbal : शरद पवारांचे येवल्यात, भुजबळ समर्थकांचे नाशिकला शक्तीप्रदर्शन!

भुजबळ समर्थकांना वाहने करून नाशिकला स्वागताला येण्याच्या सूचना
Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal V/S Sharad Pawar demonstration : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (ता.८) येवला येथे जाहिर सभा होत आहे. छगन भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी ही सभा होत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व भुजबळ समर्थकांनी छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी नाशिकला येण्याचे नियोजन केले आहे. (Bhujbal supporters planing to call all followers to power demonstration)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) उद्या नाशिकला (Nashik) येत आहे. त्यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी भुजबळ (Chahagn Bhujbal) समर्थकांनी नाशिक शहरात शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Asim Sarode On NCP Crisis : '' अजित पवारांचा गट बेकायदेशीर आणि...''; कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं खळबळजनक विधान

शरद पवार यांची उद्या छगन भुजबळ यांचा मतदारसंघ येवला येथे जाहिर सभा होत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर श्री. पवार राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडणार आहेत. त्यांचा हा पहिला दौरा आहे. त्यात येवला येथे ते सभा घेतील. या सभेत ते पक्षातून फुटलेले छगन भुजबळ यांना आव्हान देणार आहेत.

भुजबळ समर्थकांना या सभेचा राजकीय धसका वाटतो. यानिमित्ताने भुजबळ विरोधक येवल्यात एकवटणार का याची उत्सुकता आहे. त्यामुळे त्याला शक्तीप्रदर्शनातून उत्तर देण्याची तयारी भुजबळांच्या समर्थकांनी केली आहे. श्री. भुजबळ देखील मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्याच नाशिकला येत आहे. त्यांचे शहराच्या सीमेवर पाथर्डी फाटा येथे स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी येवल्याच्या समर्थकांनी वाहने करून यावे. कोणीही येवल्यात थांबू नये. पवार यांच्या सभेपेक्षा भुजबळांच्या स्वागताला मोठी गर्दी करून उत्तर देण्याची तयारी आहे.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Devendra Fadanvis असूनही BJPला Ajit Pawar यांची गरज का ? | NCP | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय वातावरण तापले आहे. भुजबळ सत्तेत आहेत. त्यांचे विरोधक सत्तेबाहेर असल्याने सत्तेचे बहुतांश लाभार्थी तसेच अन्य घटक `विकास` या गोंडस नावाखाली किती गर्दी करतात याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. दोन्ही गटांच्या शक्तीप्रदर्शनात कोणाकडे गर्दी होते हे उद्या स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com