Thane Politics | Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

Thane Politics : ठाकरेंना धक्का देत भाजपने केला सरनाईकांचा गेम... मतदारसंघातच उभं केलं नवं आव्हान!

Thane Politics : ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा आणि जिंकण्याचा इरादा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अनेकदा जाहीर बोलून दाखविला आहे.

Hrishikesh Nalagune

Thane Politics : ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा आणि जिंकण्याचा इरादा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अनेकदा जाहीर बोलून दाखविला आहे. या इराद्याला आणखी बळ देण्याच्या अनुषंगाने इतर पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांचा या तीन नेत्यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करून घेतला जात आहे.

यातच आता घोडबंदर पट्टा मजबूत करण्यासाठी भाजपने एकेकाळी जायंट किलर ठरलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांना आपल्या पक्षात घेतले आहे. रविवारी (13 एप्रिल) त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. लॉरेन्स डिसोझा यांच्या भाजप प्रवेशाचा थेट फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

कोण आहेत लॉरेन्स डिसोझा?

लॉरेन्स डिसोझा हे 2012 मध्ये ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर माजिवडा गाव परिसरातून निवडून आले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार देवराम भोईर यांचा त्यांनी पराभव केला होता. शिवसेनेतील बंडानंतरही डिसोझा यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. त्यांनी लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

पण आता माजिवडा प्रभागातील पॅनलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भवितव्य संपुष्टात आल्याने त्यांना यंदा तिकीट मिळण्याची अपेक्षा मावळली होती. त्यामुळे भविष्याचा वेध घेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे माजिवड्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यांच्यासोबत त्यांची कन्या स्टेफनी डिसोझा आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लॉरेन्स डिसोझा यांना प्रवेश देत भाजपने ताकद वाढविलेला माजिवडा प्रभाग हा शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांचा बालेकिल्ला समजला जातो. शिवाय ओवळा-माजिवडा हा विधानसभा मतदारसंघ हा भाग ठाणे महानगरपालिकेपुरता सीमित नाही. ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो.

त्याचवेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग ओवळा-माजिवडा याच मतदारसंघात येतात. त्यामुळे डिसोझा यांना घेऊन भाजपने केवळ ठाण्यातील नाही तर मिरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आपली ताकद वाढवल्याची चर्चा आहे. यातूनच सरनाईक यांच्यापुढेही आव्हान उभे राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT