Amit Shah, Eknath Shinde meeting : एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर अमित शाहांनी दिले मोठे आश्वासन; म्हणाले, 'राज्यात लवकरच...'

Amit Shah Maharashtra announcement News : महायुतीमधील घटक पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. त्यातच रविवारी दुपारी सलग तीन दिवसात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली.
Amit Shah, Eknath Shinde
Amit Shah, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. रायगड येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शाह शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे मुक्कामी आले होते. त्यानंतर महायुतीमधील घटक पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. त्यातच रविवारी दुपारी सलग तीन दिवसात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास तासभर चर्चा झाली. यामध्ये शाह यांच्याशी राज्यातील वित्त विभागाच्या निधी वाटपासंदर्भात चर्चा झाली. यावेळी अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना महत्त्वपूर्ण आश्वासन दिले.

या बैठकीत राज्याच्या वित्त विभागाच्या निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी अमित शाहांनी (Amit Shah) एकनाथ शिंदेंना महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. 'राज्यात लवकरच सर्व काही ठीक होईल. महायुतीसाठी तुम्ही जे काही त्याग आणि योगदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही,' असे शाह यांनी स्पष्ट केले.

Amit Shah, Eknath Shinde
Amit Shah Raigad meeting : अमित शाहांच्या भेटीनंतरही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना! स्नेहभोजनानंतरही वाद कायम

केंद्रीयमंत्री अमित शाह तीन दिवसापासून राज्यात ठाण मांडून बसले आहेत. महायुती सरकारमधील नाराजी जाणून घेत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार यांच्यासॊबत चर्चा केली. शिंदे यांनी यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचा गौप्यस्फोट केला. शिवसेना आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याची तक्रारही केली. एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शाहांची भेट घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी केल्याचे समजते.

Amit Shah, Eknath Shinde
BJP Maharashtra : भाजपमध्ये जबरदस्त कोल्ड वॉर! मुनगंटीवारांना पुन्हा जड जातोय त्यांचाच पठ्ठ्या, सुरू झाला वादाचा नवा अंक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीसाठी तुम्ही जे योगदान दिले, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे येत्या काळात निधी वाटपाचा व रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

Amit Shah, Eknath Shinde
Devendra Fadnavis: CM फडणवीसांची मोठी खेळी, एकेकाळी प्रशासन हादरवणारा 'हा' धडाकेबाज अधिकारी पुन्हा टीममध्ये दाखल होणार?

गेल्या तीन दिवसापासून केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे नक्कीच महायुतीमधील तीन घटक पक्षातील संबंध ताणले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटताना दिसत नव्हता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आश्वासनांनंतर आता काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Amit Shah, Eknath Shinde
Sharad Pawar and ajit pawar News : साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड! शरद पवार अन् अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक; नेमके कारण आले समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com