Laxman Hake Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Laxman Hake: 'ओबीसी समाज यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नाही!' लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान

Maratha Vs OBC : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपाठ आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही आक्रमक झाले आहेत. हाके यांनी येत्या 4 जुलैला ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : आंदोलक मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला.तर,महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. याउलट विधानसभेला जरांगेंची फॅक्टर चाललाच नाही,शिवाय महायुतीलाही मोठं यश मिळालं. यानंतर जरांगेंच्या आंदोलनाची धार बोथट झाल्याची चर्चा होती. पण मनोज जरांगेंनी आता भावनिक आवाहन करून सगळ्या मराठ्यांना 29 जुलैला आंतरवाली सराटीमध्ये गोळा होण्याचे आवाहन केले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यापाठोपाठ आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही आक्रमक झाले आहेत. हाके यांनी येत्या 4 जुलैला ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबईत पार पडणार आहे. तर 15 जुलै रोजी ओबीसी समाजाकडून पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

ओबीसी समाजाला यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. जे जे खासदार आमदार मनोज जरांगे पाटील यांना भेटतात, त्यांची यादी आम्ही बनवले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

या लोकांना भविष्यात ओबीसी मतदान करणार नाही. तर दुसरीकडे बारामतीच्या माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी सभासदांना पैसे वाटले असं म्हणत हाकेंनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

येत्या 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाच्या नियोजनाची शेवटची बैठक काही दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत पार पडली होती. आता रणभूमीत उतरायचं, लढायचं आणि विजयाचा गुलालही मराठ्यांनीच उधळायचा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीत केलं होतं.

अंतरवाली सराटीतील बैठकीसाठी मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव जमा झाले होते.अंतरवालीकडे जाणारे सगळे रस्ते जाम आणि वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.या बैठकीत मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात असल्याचंही जरांगेंनी यावेळी म्हटलं होतं.

आत्तापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्या असून 4 कोटी मराठा समाज आरक्षणात गेला आहे, असा दावा जरांगे पाटलांनी केला. तसेच ही आरपारची लढाई फक्त सात ते उर्वरित आठ टक्के समाजासाठी असल्याचे जरांगे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT