
Maratha March News : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला दिली आहे. 29 आॅगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाच्या नियोजनाची शेवटची बैठक आज अंतरवाली सराटीत सुरू आहे. आता रणभूमीत उतरायचं, लढायचं आणि विजयाचा गुलालही मराठ्यांनीच उधळायचा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
अंतरवाली सराटीतील बैठकीसाठी मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव जमा झाले आहेत. अंतरवालीकडे जाणरे सगळे रस्ते जाम झाले असून वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई आता अंतिम टप्यात आहे, 58 लाख नोंदी सापडल्या असून 4 कोटी मराठा समाज आरक्षणात गेलायं, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. फक्त सात ते आठ टक्के समाज राहिला आहे, त्यासाठी आता ही आरपारची लढाई असल्याचे जरांगे म्हणाले.
27 आॅगस्टला सकाळी दहा वाजता अंतरवालीतून मुंबईसाठी मराठा समाज बांधव निघणार आहेत. दोन दिवस आणि दोन रात्रीतून सलग जाऊन 29 रोजी मुंबई गाठायची आहे. (Manoj Jarange Patil) मायबाप मराठ्यांनो प्रत्येक वेळेस आपल्याला नाव ठेवलं जायचं, फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. पण तुम्हाल मानावं लागेल, तुम्ही फुटला नाहीत, जातीसाठी एकत्र कसं यायचं हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. आता लढायंच, रणभूमीत उतरायचं आणि विजय मिळवायचाच, मागे हटायचं नाही.
मैदान गाजवायचं, विजय मिळवल्याशिवाय परतायचं नाही. लाखो मराठे एकत्र आलेत, आता विजयापासून कोणी रोखू शकत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. दोन वर्ष झाले आपण लढतोय. हा संघर्ष लढाई आता जिंकायची म्हणजे जिंकायची, ही अंतिम लढाई आता पार पाडायची. राजकीय लोकं, पक्ष कोणाताही असू द्या, निवडून येण्यासाठी रात्रंदिवस मरमर करतात. तुमच्या लेकरांसाठी, जातीसाठी कोणी मरमर करत नाही. तुम्हालाच आता जातीसाठी आणि लेकरांसाठी मरमर करायची आहे, एकानेही मागे हटायचं नाही.
75 वर्ष आपण आरक्षणाची वाट पाहतोय, आता आपण अंतिम टप्यात आलोय. त्यालाही हे कळालयं 8-9 टक्केच मराठा राहिलेत आरक्षणात जायचा. याबारीने आता दणकाच हाणायचा, मायबाप समाज आरक्षणाची वाट बघतोय ते देण्याची जबाबदारी तुमची अन् माझी. आपण बाहेर पडल्याशिवाय लेकरांना न्याय मिळणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. विषय आपल्या हक्काच्या लढाईचा आहे.
58 लाख नोंदी सापडल्या असून चार कोटी मराठे आरक्षणात गेले. नुसतं कन्हायचं, आमच्यापुढे ये सभा घे, नाकावरचा चष्मा वर सरकव. मराठ्यांचा नाद नाही करायचा ठोकलेला खुटा अजून यांना उपटना, असे म्हणज मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. गावागावातून तयारी करायची 29 आॅगस्टला मुंबईला जायचं, 27 आॅगस्टला सकाळी दहा वाजता अंतरवाली सोडायची. यावेळी सलग जायचयं कुठेही न थांबता, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.