Laxman Jagtap News, Rajyasabha election 2022 News Updates Sarkarnama
मुंबई

लक्ष्मण जगतापांनी फडणवीसांना 'सीएम साहेब' म्हणून हाक मारली!

लक्ष्मण जगताप यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान केले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेली काही दिवस जीवघेण्या आजाराशी सामना करून नुकतेच घरी परतलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Mla Laxman Jagtap) हे राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya sabha Election) मतदानासाठी शुक्रवारी सकाळी कार्डियाक रुग्गवाहिकेतून मुंबईला रवाना झाले. ते दुपारी साडेबारापर्यंत विधान भवनात पोचले. त्यांना घेण्यासाठी खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खाली आले होते. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांना सीएम साहेब, सीएम साहेब अशी हाक मारली. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीपीई कीट घालूनच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. (Laxman Jagtap Gave his vote for Rajya Sabha elections)

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. अमेरिकेहून मागवलेल्या इंजेक्शननंतर त्यांची प्रकृती सुधारत गेली, त्यानंतर सुमारे ५० दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्याचदरम्यान राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली होती. जगताप हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्या भाजपने राज्यसभेसाठी एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे, त्यामुळे मोठी चुरस दिसून येत आहे.

आमदार जगताप हे आज सकाळी कार्डियाक रुग्णवाहिकेतून राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबईला रवाना झाले. ते दुपारी साडेबाराच्या सुमारास विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले, त्यावेळी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष्मण जगताप यांना आणण्यासाठी आले होते. रुग्णवाहिकेतून खाली उतरल्यानंतर लक्ष्मण जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सीएम साहेब, सीएम साहेब असा केला आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी आज दुपारी साडेबारापर्यंत राज्यातील २३८ आमदारांनी मतदान केले आहे. ही सर्व मते वैध ठरली आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT