पंकजा मुंडेंना डावलल्याने भाजपमध्ये बंड; फडणवीस, पाटील यांच्यावर गंभीर आरोप

Rajyasabha Election 2022 | पक्ष ताब्यात घेऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हुकुमशाही करत आहेत
Pankaja Munde News, Rajya sabha election 2022 News
Pankaja Munde News, Rajya sabha election 2022 News

Pankaja Munde latest news

पिंपरी : राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी तीव्र इच्छूक भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाने दोन्हीकडेही डावलल्याने त्यांच्या समर्थकांत तीव्र असंतोष पसरला आहे. त्यातून त्यांनी औरंगाबाद येथील भाजपच्या (BJP) कार्यालयावर गुरुवारी (९ जून) मोर्चा काढून जाब विचारला. (Rajya sabha election 2022 News)

तर औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पंकजा मुंडेंना डावलल्याच्या निषेधार्थ शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात आले. धक्कादायक म्हणजे नगर येथे पंकजा मुंडेंच्या एका समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आता आंदोलनाचे हे लोण पिंपरी चिंचवडपर्यंत पोहचले आहे. आज (10 जून ) मुंडे समर्थक शहरात आंदोलन करणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडचे ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी दिली आहे.

Pankaja Munde News, Rajya sabha election 2022 News
कुकडीचे सुटणार उन्हाळी आवर्तन : राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

दरम्यान, पंकजा मुंडेंना डावलल्याने पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये बंड सुरु झाले आहे. शहरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाय ठेवू देणार नाही, अन्य़था त्यांच्या तोंडाला काळे फासू,असा इशारा पंकजा मुंडे समर्थक दत्ता कायंदे यांनी दिला. मास लिडर, लोकनेत्या पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाणुनबुजून न देऊन त्यांना डावललण्यात आल्याचा दावा त्यांनी त्यात केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे पार्टी ताब्यात घेऊन हुकुमशाही करत आहेत,असा हल्लाबोल त्यांनी केला.फडणवीसांचे पीए आमदार होतात, पंकजांताईंच्या जवळच्या लोकांनाही संधी मिळते. कालपर्यंत नाव असताना त्यांचा पत्ता एकदम कट होतो, याबद्दल कायंदेनी आश्चर्य व्यक्त केले. फडणवीस टोळीला स्व.गोपीनाथ मुंडे आणि पंकजा यांची अॅलर्जी झाली आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com