<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis Politics News Updates</p></div>

Devendra Fadnavis Politics News Updates

 

Sarkarnama

मुंबई

महाआघाडीवर तोफ डागत फडणवीसांनी केले राणेंचे अभिनंदन

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या सिद्धिविनायक पॅनेलचे ११ उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.(Devendra Fadnavis Politics News Updates)

फडणवीस यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, रवींद्र चव्हाण, सर्व भाजप नेते, कार्यकर्ते, विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!''

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांची प्रतिष्ठ पणाला लागली होती. नारायण राणे विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याच निवडणूक झाली. या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे ही निवडणूक अधिक गाजली. मात्र, सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले. दुसरीकडे भाजपचे वर्चस्व असले तरी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT