Uddhav Thackeray -Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : '...तेव्हा आम्हाला 'मातोश्री'हून आव्हाडांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे!'

Jitendra Awhad Controversy : 'आव्हाड दुतोंडी साप ...'

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर-

Thane News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट अक्षरश: तुटून पडला आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा काही दिवसांवर आला असतानाच आव्हाडांनी राम हा मांसाहारी होता, असं विधान करत विरोधकांना आयतं कोलित दिले.

यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून महायुतीतील भाजपसह इतर घटकपक्षांनी रान पेटवलं आहे. आता याच मुद्द्यावरून ठाण्याचे महापौर आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची जहरी टीका करताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही लक्ष केले आहे.ते म्हणाले,आव्हाड यांच्याविरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून आव्हाडांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असे सांगितलं जायचं, असेही खळबळजनक दावा म्हस्के यांनी केला आहे.

तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री (Matoshree) आणि संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व, असा टोला म्हस्के यांनी ठाण्यातील आनंद आश्रमामधून प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. याशिवाय लोकांची माथी भडकावण्याचं काम करून दंगली भडकवण्याचा आव्हाडांचा कट असल्याने याबाबत सरकारने चौकशी करावी, अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

"आव्हाड रात्रीचे ट्विट करतात आणि..."

म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) रात्रीचे ट्विट करतात आणि सकाळी ते डीलिट करतात. रात्री त्यांची अवस्था काय असते, हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा असे म्हटले. तसेच नेहमीप्रमाणे त्यांनी आता खंत व्यक्त केली आहे. कदाचित ते त्या दिवसापासून ते आतापर्यंत त्या अवस्थेतून निघाले नसतील, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आव्हाड यांच्याविरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो, तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचं, एवढा मातोश्रीला जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी प्रेम होत. तसेच कळवा शिवसेना शाखा तोडण्याचा पुरावा आम्ही दिला होता. तरीदेखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, असा सवाल म्हस्के केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT