Rashmi Shukla Director General of Police : मोठी बातमी! राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

Maharashtra News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांची ओळख...
Rashmi Shukla News
Rashmi Shukla NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ यांच्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी कोण यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले होते. नवे डीजीपी म्हणून सध्या केंद्रांत प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला आणि मुंबईचे सीपी विवेक फणसळकर यांची नावे आघाडीवर होती.

याचवेळी काही दिवसांपूर्वी फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. पण आता राज्याच्या पोलिस महासंचालकपदी अखेर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला यांना जवळपास 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यानंतरही सरकार शुक्लांना मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.  त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. (Director General of Police)

Rashmi Shukla News
Election Year 2024 : जगातील निवडणुका यंदा इतिहास घडवणार; भारतासह 65 देशांमध्ये वर्चस्वाची लढाई

राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचा अधिकृत अध्यादेश गुरुवारी काढण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदांबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांची ओळख आहे.

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी यापूर्वी पुण्याचे पोलिस आयुक्त, डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), म्हणून काम पाहिले आहे. पण राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) आयुक्तपदाचा त्यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या सर्व आरोपांतून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्लांवर गुन्हे दाखल झाले होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता, पण काही दिवसांपूर्वीच त्यांना 'फोन टॅपिंग'मध्ये शुक्लांना मोठा दिलासा न्यायालयाने दिला आहे.

Rashmi Shukla News
Amol Kolhe : 'मान खाली घालून गद्दारांबरोबर जाणं मनाला पटलं नाही, त्यामुळं...' ; अमोल कोल्हे थेट बोलले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com