मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी संयुक्तपणे लढली होती. त्यात सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने उद्या (ता.२०) विधान परिषदेच्या (legislative council) मतदानाला आघाडी स्वतंत्रपणे सामोर जात आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने कोट्याचं गणित आधीच ठरवलं होतं. त्यामुळे शिवसेनेला याचा फटका बसला होता. (vidhan parishad election latest news)
राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या धड्यानंतर महाविकास आघाडी सावध पावलं टाकत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांचे गणित जुळविण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांची धावपळ सुरू आहे.मतदानासाठी काही तास शिल्लक असताना मुंबईत राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होत आहेत.
कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते नसल्याने मतांच्या फोडाफोडीवर साऱ्यांनीच भर दिला आहे. सर्व पक्षांचे आमदार मुंबईत मुक्कामी आहेत.मतांची आकडेमोड सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यसभेला ज्या प्रकारे दगाफटका बसला होता, तो यावेळी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली असल्याची चर्चा आहे. जेणेकरून शिवसेनेच्या उमेदवारांना कोणताही दगाफटका बसणार नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी कोटा ऐनवेळी ठरवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी उद्या सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात आहे, त्यामुळे कुणाच्या पारड्यात मत मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 26 चा कोटा आवश्यक आहे.
"मी स्वत: मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, मुख्यमंत्री महोदय तुमचे 55 आणि 6 असे 60 आमदार शिवसेनेचे होतात. 30-30 चा जरी कोटा द्यायचा झाला तरी शक्य आहे. मागच्या वेळेस जो दगाफटका झाला ते बघितल्यानंतर माणूस कसं दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पितं. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही आमदारांना फोन केले. मी पण केले. जे 60 लोकं सोडून जे इतर अपक्ष होते जे आघाडीला पाठिंबा देणारे होते शिवसेनेचे सहयोगी अशांना आम्ही पण फोन केले. सीएम साहेबांना स्पष्ट सांगितलं की, मी फोन केला," असे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.