सुहास कांदे संशयाच्या भोवऱ्यात ; शिवसेनेकडून चौकशी सुरु, ही चूक झालीच कशी ?

दोन दिवस सातत्याने कार्यशाळा घेऊन सुहास कांदे यांच्याकडून ही चूक झालीच कशी ?
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई :राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha elections) शिवसेनेला (Shiv Sena) फटका बसला आहे, त्यामुळे सोमवारी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हायअलर्ट झाली आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या एका मताचा शिवसेनेला फटका बसला. त्यामुळे संजय पवार यांचा पराभव झाला. (Suhas Kande latest news)

दोन दिवस सातत्याने कार्यशाळा घेऊन सुहास कांदे यांच्याकडून ही चूक झालीच कशी ? यासंदर्भात चौकशी केली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत सुहास कांदे यांनी जाणीवपूर्वक चूक केली की अनावधानाने झालं याची चौकशी शिवसेनेची समिती करीत आहे.

यावेळी जर कोणत्या आमदाराने मतदान करताना चूक केली तर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले."जर कोणत्या नेत्याने दगाफटका केल्यास त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार,"असा इशारा देण्यात आला आहे.

MLA Suhas Kande
आमदारांना धमकावलं, आघाडीनं केलं भाजपचं स्टिंग ऑपरेशन ; रेकॉर्डिंग उघड करणार !

कांदे यांनी मतदानाच्या प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचा भाजपाने आरोप केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कांदे यांचे मत अवैध ठरवून बाद केले होते. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती धीरजसिंह ठाकूर यांच्या खंडपीठासमोर कांदे यांची याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली.

सुहास कांदे यांच्या याचिकेला निवडणूक आयोगाने बुधवारी प्राथमिक आक्षेप घेतला. त्यामुळे या आक्षेपाबाबत सुनावणी घ्यायची असल्याचे नमूद करून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २४ जून रोजी ठेवली आहे.

मत अवैध ठरवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कांदे यांनी आव्हान दिले आहे. त्या वेळी कांदे यांनी रिट याचिका नव्हे, तर निवडणूक याचिका दाखल करायला हवी होती, असा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे वकील अभिनव चंद्रचूड यांनी घेतला. याच मुद्दय़ावर कांदे यांनी केलेली याचिका फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली.

MLA Suhas Kande
गृहमंत्र्याच्या नावानं पुण्यातील महिलेला दहा लाखांचा गंडा

कांदे यांना सुनावणीची संधी दिली नाही. शिवाय मतपत्रिका मतपेटीत टाकल्यानंतर त्यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला होता, त्याआधी नाही, असा दावा कांदे यांच्या वतीने वकील अनिल अंतुरकर यांनी केला."मत अवैध ठरवताना निवडणूक आयोगाने कोणतेही निष्कर्ष नोंदवले नाहीत, असेही अंतुरकर यांनी न्यायालयाला सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com