Sharad Pawar News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : शरद पवार गटातील आठ आमदारांना विधीमंडळाने बजावली नोटीस!

Legislature Notice : म्हणणं मांडण्यासाठी आठ दिवसांची दिली मूदत

Mayur Ratnaparkhe

Sharad Pawar Vs Ajit Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाच्या आठ आमदारांना विधीमंडळानं नोटीस बजवली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती. आता याबाबत आठ दिवसांत आपलं म्हणणं मांडण्याची विधीमंडळाच्या नोटीसीद्वारे या आठ आमदारांना मुदत देण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार गटाकडून लवकरच यावर उत्तर दाखल करण्यात येणार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शरद पवार गटातील दहा आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र नोटीस नाही. तर नवाब मलिक यांच्याकडून तटस्थ राहणं पसंद केल्याने त्यांना देखील नोटीस नाही.

आठ आमदार कोणते? -

१) अनिल देशमुख, २) राजेश टोपे, ३) सुनिल भुसारा, ४) प्राजक्त तनपुरे, ५) रोहित पवार, ६) सुमन पाटील, ७) बालासाहेब पाटील, ८) संदीप क्षिरसागर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात काही आमदार बाहेर पडल्याने फूट पडली. यानंतर शरद पवार गटाकडून बाहेर पडलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. परंतु, अजित पवार गटाने विधीमंडळात याचिका दाखल करत, आपल्या का अपात्र केले जाऊ नये हे सांगितले.

त्यावर उत्तर देण्यासाठी विधीमंडळाने सुरुवातीस जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आता शरद पवार गटातील आणखी आठ आमदारांना ही नोटीस बजावण्यात आली. याशिवाय अजित पवार गटातील ३० आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT