Sharad Pawar News : पवार-दीपक केसरकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा!; राज्य सरकारवर वाढला दबाव

Maratha Reservation Deepak Kesarkar Meeting With Sharad Pawar : आरक्षणासाठी राज्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आहे.
Sharad Pawar, Deepak Kesarkar
Sharad Pawar, Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. नेत्यांना प्रवेशबंदी आणि मंत्र्यांचा ताफा अडवला जात आहे. दुसरीकडे आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसांत मार्गी लागणार, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.

Sharad Pawar, Deepak Kesarkar
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून महायुतीतील आमदाराचे सरकारविषयी मोठे वक्तव्य, सर्वांच्या भुवया उंचावल्या

आरक्षणावरून राज्यात आंदोलनाचा भडका उडाला असताना आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत शरद पवार आणि दीपक केसरकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपली भेट घेतल्याचा फोटो स्वतः शरद पवार यांनी ट्विट केला आहे. शरद पवार यांनी आपल्या ट्विटवर ही माहिती दिली आहे. सकाळी ११.५५ वाजताचे हे ट्विट आहे. पण दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली, याची माहिती शरद पवारांनी या ट्विटमधून दिलेली नाही. मात्र, मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

'मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार'

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर मराठवाड्यातील शिवसेने आमदार (शिंदे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळमध्ये येणार आहेत. त्या ठिकाणी मराठवाड्यातील शिंदे गटाचे आमदारही जाणार आहेत. त्या ठिकाणी मराठा आरक्षण कसं मिळवता येईल? यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, अशी माहिती शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.

Sharad Pawar, Deepak Kesarkar
Maratha Reservation : आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; माहूरमध्ये अशोक चव्हाणांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com