yogesh sagar
yogesh sagar sarkarnama
मुंबई

मुंबईकरांची जमीन बिल्डरनं लाटली ; पाचशे कोटींचा भ्रष्टाचार, भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केला आहे. या प्रकरणाची चैाकशी करुन स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईकरांची हक्कांची जमीन बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे, असा आरोप आमदार योगेश सागर (bjp mla yogesh sagar) यांनी यावेळी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना (uddhav thackeray) पत्र लिहिलं आहे.

''पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराच्या हे प्रकरण त्वरीत स्थगिती करा, अन्यथा मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल,'' असा इशारा योगेश सागर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

''मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. पण मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्याने, खेळाचे मैदान नष्ट झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये महापालिका त्यांच्या ताब्यातील उद्यानासाठी आरक्षित व अतिक्रमण नसलेले बांधकाम योग्य भूखंड अजमेरा बिल्डरला अदलाबदलीत देण्यात आला आहे.

या बदल्यात अजमेरा बिल्डरकडे असणारा बांधकाम अयोग्य व पर्यावरणविषयक परवानग्याच्या कचाट्यात अडकणारा भूखंड मुंबई महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनकरिता ताब्यात घेतला आहे,''

''यातील खरा गैरव्यवहार स्पष्ट आहे, तो म्हणजे अजमेरा बिल्डरची पर्यावरणविषयक परवानग्या मिळवण्याच्या अनंत अडचणीतून सुटका करणे आणि या आदलाबदलीच्या व्यवहारात त्याचा सरळ सरळ ५०० कोटींचा फायदा करून देणे, त्यामुळे मुंबईकरांची हक्काची जमिन बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट सत्ताधरी सेना व महाविकास आघाडीच्या साथीदारांनी घातला आहे,'' असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT